शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 16:35 IST

बंडगार्डन येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे समोरील बॅनर्जी चौकातून पायी जात असताना एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसका मारुन चोरुन नेली होती़.

ठळक मुद्देसीसीटीव्हीतून उघडकीस आला गुन्हा : २४ तासात अटक

पुणे : वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेणाऱ्या चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने अटक केली़. अमोन ऊर्फ सनी सॅमसंग कोल्हापूरे (वय ३२, रा़ न्यू मंगळवार पेठ, नरपतगिरी चौक) असे त्याचे नाव आहे़. त्याच्याकडून चोरीस गेलेली ४५ हजार रुपयांच्या सोनसाखळीचे दोन तुकडे जप्त करण्यात आले आहे़. अरुणा वागळे (वय ७०, रा़ रास्ता पेठ) या १२ जुलै रोजी पावणेसात वाजता बंडगार्डन येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे समोरील बॅनर्जी चौकातून पायी जात असताना एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसका मारुन चोरुन नेली होती़. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट ३ करुन केला जात होता़. आरोपीने घातलेले कपडे आणि त्याची देहयष्टी याची माहिती घेऊन सीसीटीव्हीच्या फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर त्या भागातून एकच पळत जात असल्याचे पोलीस नाईक अतुल साठे यांनी निष्पन्न केले़. सीसीटीव्ही फुटेजच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिवानंद स्वामी, सुजित पवार, अतुल साठे यांनी स्थानिक नागरिकांकडे विचारपूस केली़. तेव्हा चोरलेली सोनसाखळी विकण्यासाठी तो पुणे स्टेशन येथील कॅफे ग्रँड  हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली़ पोलिसांनी सापळा रचून सनी कोल्हापूरे याला पकडले़. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाThiefचोरArrestअटकPoliceपोलिसGoldसोनं