शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

दौंड तालुक्यातील केडगाव येथे बिबट्याशी वृध्द महिलेची झुंज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 14:46 IST

एका वृद्ध महिलेने थेट बिबट्यावरच लाठीने हल्ला करून त्याला पिटाळून लावल्याची थरारक घटना घडली..

केडगाव : बिबट्याने मेंढ्यांवर हल्ला चढविल्याचे पाहून एका वृद्ध महिलेने थेट बिबट्यावरच लाठीने हल्ला करून त्याला पिटाळून लावल्याची थरारक घटना दौंड तालुक्यातील देलवडी येथे रविवारी घडली. सुुशीला येळे (वय ६३) असे या वृद्ध महिलेचे नाव असून, त्यांच्या या धाडसाचे कौतूक होत आहे. देलवडी परिसरात गेल्या १५ दिवसांपासून बिबट्याने दहशत पसरवली आहे.  यामुळे ग्रामस्थ बाहेर पडण्यास धजावत नाहीत, अशा स्थितीतही सुशीला येळे या येथील एका पडीक जमिनीत त्यांच्या बकऱ्यांना आणि शेळ्यांना चरायला घेऊन आल्या होत्या. जवळपास १२ बकऱ्या आणि शेळ्या चरत असताना अचानक त्याच्या दोन पिलांसह दबा धरून असलेल्या बिबट्याने शेळ्यांवर हल्ला चढविला. बकऱ्यांचा आवाज आल्याने सुशीलाबाई धावत तेथे गेल्या. यावेळी बिबट्या शेळ्यांवर हल्ला करत असताना त्यांना दिसला. यावेळी त्यांनी न घाबरता थेट त्यांच्या हातातील काठीने बिबट्यावर हल्ला चढविला. यावेळी चवताळून बिबट्याने त्यांच्यावर प्रतिहल्ला केला; मात्र त्यांनी न घाबरता काठीने बिबट्याला बदडून काढले. यामुळे घाबरलेला बिबट्या त्याच्या बछड्यांना तोंडामध्ये घेऊन पसार झाला. येळे यांच्या प्रसंगावधानाने आणि साहसामुळे त्यांचा स्वत:चा अन् शेळ्यांचा जीव वाचला. 

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याWomenमहिला