शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

अबब...! पुण्यात पाच महिन्यांत मास्क न घालणाऱ्यांकडून तब्बल 18 कोटी 64 लाखांचा दंड वसूल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 20:43 IST

सध्या टार्गेट ठेवून केली जाते दंड वसुली 

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर लोकांना मास्क वापरण्याची सवय लागावी म्हणून प्रशासनाने  सप्टेंबर महिन्यापासून रस्त्यावर,  सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणा-या व रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली. यात गेल्या पाच महिन्यांत एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल 5 लाखांहून अधिक लोकांवर कारवाई करण्यात 18 कोटी 64 लाख 90 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. सध्या लोकांनी मास्क घालावा याबाबत जनजागृती करत दंड वसुली करण्याऐवजी मास्क न घालणारी व्यक्ती दिसल्यास कसा भेटला बकरा या अविर्भावात पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पोलीस, प्रशासनाला सापडलेला 'महसुल ' गोळा करण्याचा नवा फंडा सापडला आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यांत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडाला. गेल्या दहा महिन्यांत ही संख्या 3 लाख 61 हजारांवर जाऊन पोहचली. यात तब्बल 8 हजार 785 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आज जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 837 ऐवढी आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात कोरोनाची रूग्ण संख्या प्रचंड वेगाने वाढत असताना नागरिक मात्र फारसे गंभीर नव्हते. कोरोना हा उद्रेक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना सुरू केल्या. याच कारवाईचा एक भाग म्हणून मास्क न घालणारे व रस्ता, सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात सर्वाधिक 9 कोटी 83 लाखांचा दंड पुणे शहरातून वसूल करण्यात आला आहे. त्यानंतर ग्रामीण भागात 2 लाख 32 हजार 350 लोकांवर कारवाई करत 5 कोटी 20 लाखांचा व पिंपरी चिंचवड शहरातून 90 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. ------जिल्ह्यात अशी झाली कारवाई पुणे शहर : लोकसंख्या- 2 लाख 4 हजार 444                  दंडाची रक्कम- 9 कोटी 83 लाख 53 हजार पिंपरी-चिंचवड  : लोकसंख्या-  66 हजार 566                           दंडाची रक्कम- 90 लाख 55 हजारपुणे ग्रामीण :  लोकसंख्या- 2 लाख 32 हजार 350                       दंडाची रक्कम- 5 कोटी 20 लाख 48 हजार

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाshravan hardikarश्रावण हर्डिकरPoliceपोलिस