शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे ! मुंबई- बंगळुरु महामार्गावर एकापाठोपाठ ६ अपघात; भूमकर पुलावरुन ट्रक खाली कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 11:37 IST

या अपघातांमुळे संपूर्ण महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे...

पुणे : मुंबई- बेंगळरू महामार्गावर पहाटेपासून अपघाताची मालिका सुरु असून आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी ६ अपघात घडले आहेत. या अपघातात २ जणांचा मृत्यु झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. कात्रजवरुन आलेला एक ट्रक  भूमकर पुलावरुन खाली कोसळला आहे. या अपघातांमुळे संपूर्ण महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. पुढे ट्रॉफिक जाम झाले असल्याचे दिसत असतानाही दोन ट्रक पुढे थांबलेल्या वाहनांवर जाऊन धडकले आहेत. 

सोमवारी पहाटे या महामार्गावर भरधाव आलेल्या ट्रकने पुढील ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. त्यात ट्रकमधील दोघांचा जागीच मृत्यु झाला तर एक जण जखमी झाला होता. तर दोन ट्रक समोरासमोर एकमेकांना धडकून पलटले होते. या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. असे असतानाच कात्रजवरुन आलेल्या एका ट्रकचे नियंत्रण सुटल्याने तो भूमकर पुलावरुन खाली सर्व्हिस रोडवर कोसळला. त्यापाठोपाठ दोन ट्रकच्या मधून एक रिक्षा जात होती. त्यात मागील ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षा पुढील ट्रकला धडकली. त्यात दोन्ही ट्रकमध्ये रिक्षा अडकून पडली. त्यात रिक्षाचालक व प्रवासी महिला जखमी झाले. सुदैवाने महिलेचे २ महिन्यांचे बाळ सुखरुप बचावले आहे. 

अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली असतानाच वेगाने आलेल्या ट्रकने पुढील वाहनांना धडक देण्याच्या आणखी दोन घटना या महामार्गावर घडल्या. त्यात ग्रामीण पोलीस दलाची व्हॅन व एका कारचे नुकसान झाले आहे.

वाहतूक शाखेचे कर्मचारी व सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातhighwayमहामार्ग