अरे देवा! सहा महिन्यांच्या गोंडस बाळाला सोडले दर्ग्याच्या परिसरात; दहा दिवसांतली दुसरी घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 06:44 PM2021-02-23T18:44:02+5:302021-02-23T18:45:40+5:30

पालकांचा शोध घेण्याचे काम सुरू

Oh god ! Left a cute six-month-old baby in the area of darga ; The second incident in ten days | अरे देवा! सहा महिन्यांच्या गोंडस बाळाला सोडले दर्ग्याच्या परिसरात; दहा दिवसांतली दुसरी घटना 

अरे देवा! सहा महिन्यांच्या गोंडस बाळाला सोडले दर्ग्याच्या परिसरात; दहा दिवसांतली दुसरी घटना 

Next
ठळक मुद्देखराडी हजरत पठाण शावली बाबा दर्गा येथील घटना;चंदननगर पोलिसांनी घेतली ताब्यात

चंदननगर: पुण्यात पुन्हा एकदा हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. खराडी येथील हजरत पठाण शावलीबाबा दर्ग्याच्या परिसरात सहा महिन्यांच्या मुलीला तिचे पालक सोडून गेल्याची घटना सोमवारी ( दि. २२ ) संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली. महत्वाचे म्हणजे दहा दिवसांत अशा प्रकारची ही दुसरी घटना घडली आहे. 

चंदननगरपोलिसांना सोमवारी संध्याकाळी खराडी परिसरातील एका सहा महिन्यांच्या मुलीला तिचे पालक सोडून गेल्याची माहिती मिळाली.यानंतर काही क्षणातच पोलिसांचे दामिनी पथक घटनास्थळी दाखल होत बाळाला ताब्यात घेतले.आता पोलिसांकडून बाळाच्या आईवडिलांचा तपास सुरु आहे. 

चंदननगर पोलीस ठाण्याचे पांडुरंग नाणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी वाडेकर या तरूणाने नाणेकर यांना फोन करून नगररस्ता दर्गा येथील मागच्या बाजून एका सहा महिन्यांच्या मुलीला तिचे पालक सोडून गेल्याची माहिती दिली. नाणेकर यांनी त्वरीत चंदननगर पोलीस ठाण्याच्या महिला पोलिस उज्वला बनकर,एस.बी वाळके, एफ.एम.काळे,समीर शेख,संदीप पाटील यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मुलीला ताब्यात घेत चंदननगर पोलिस ठाण्यात घेऊन गेले.तिच्या पालकांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे नाणेकर यांनी सांगितले.

Web Title: Oh god ! Left a cute six-month-old baby in the area of darga ; The second incident in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.