शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

ओडिशात नागरिकांना सुरक्षित हलविले, मराठी अधिकाऱ्यांमुळे महाराष्ट्राची मान उंचावली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 4:31 AM

ओडिशात हवामान खात्याचा इशारा अत्यंत गांभीर्याने घेतला जातो. कुठल्याही वादळाची शक्यता वर्तवण्यात आली तरी आमची टीम सज्ज होते. याकरिता आधीच प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. यापूर्वी 'तितली' , फायलिन' सारख्या वादळांचा अनुभव असल्याने नागरिक अधिक सजग झाले आहेत. - विजय कुलंगे, जिल्हाधिकारी, गंजाम, ओडिशा

- नेहा सराफफोनी चक्रीवादळाने ओडिशात धुमाकूळ घालून जनतेचे जीवन विस्कळीत केले. हजारो घरांचे नुकसान झाले अन् नागरिकांचा आसराच काढून घेतला. या फोनीच्या फटक्यातही ओडिशामध्ये एका मराठमोठ्या जिल्हाधिकाºयाने केलेल्या कामामुळे लाखो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. फोनीच्या वादळी संकटावर विजय कुलंगे यांनी सर्वाधिक नुकसान झालेल्या गंजाम जिल्ह्यात तत्परतेने तीन लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. महाराष्ट्रातील अहमदनगरचे सुपुत्र असलेल्या जिल्हाधिकारी विजय कुलंगे यांच्याशी साधलेला हा संवाद.प्रश्न : फोनीच्या संकटानंतर खबरदारीच्या काय उपाययोजना केल्या?- गंजाम जिल्ह्यात अवघ्या ३६ तासांमध्ये जिल्हा प्रशासनाने तीन लाख लोकांचे स्थलांतर केले. या नियोजनामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकही जीवितहानीची घटना घडली नाही. इतकेच नव्हे तर वादळ संपल्यावर अवघ्या दोन तासात या जिल्ह्यातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले. ओडिशामध्ये अनेक मराठी अधिकारी काम करत असल्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे.प्रश्न : स्थलांतर करताना काय खबरदारी घ्यावी लागली ?- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फोनी हे चक्रीवादळ शुक्रवारीओडिशा किनारपट्टीला धडकले. त्यानंतर ओडिशा प्रशासनाला सूचना देऊन तत्परतेने कामाला सुरवात केली. प्रशासनानेही नियोजन आणि तात्काळ अंमलबजावणीच्या प्रक्रियेची आखणी अत्यंत काळजीपूर्वक केली. गंजाम जिल्ह्यात ५ तालुके वादळामुळे प्रभावित झाले होते.प्रश्न : हवामान खात्याच्या इशाºयाचा काय फायदा झाला?- फोनीबाबत हवामान खात्याने पाच दिवस आधी प्रशासनाला या विषयी कळवले होते. त्यानुसार गंजाममधून नियोजन करून शेवटच्या दीड दिवसांत तीन लाख नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर केले गेले. यातही प्राधान्याने गरोदर महिला, अपंग, वयोवृद्ध यांना हलविण्यात आले. यावेळी ५४० गरोदर महिलांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. यातील १५३ महिलांची तीन तारखेला प्रसुतीही झाली. प्रत्येक स्थलांतर स्थळी अन्न, पाणी, जनरेटर आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवली होती.वादळात जिल्ह्याधिकारी रस्त्यावरप्रत्यक्षात हे वादळ जिल्ह्यात आल्यावर दुलंगे यांनी जीवाची पर्वा न करता थेट किनारपट्टीनजीकच्या महामार्गावर धाव घेतली. रस्त्यावर काही अडचण निर्माण झाल्यास लवकर पोहोचता यावे यासाठी दोन कॉडलेस फोन, चार ते पाच वेगवेगळे सीम कार्डचे मोबाईल आणि चार कर्मचाऱ्यांसह त्यांनी रस्त्यावर फिरणे पसंत केले. त्यांच्या या साहसाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.अशी राबविलीआपत्कालीनयंत्रणाअन्न, पाणी, जनरेटर आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवली होती. स्थानिक भागातील केटरर्स सेवा देणाºया व्यक्तींशी संपर्क करण्यात आला होता. अनेक नागरिक आपली जनावरे किंवा पाळीव प्राणी सोबत घेऊन येत असल्याने त्यांनाही दाखल करून घेण्यात आले. या काळात सर्व माध्यमांचा आधार घेऊन कच्च्या घरातून बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले. शिवाय प्रत्यक्ष वादळाला सुरुवात झाल्यावर कोणीही बाहेर पडू नये असाही प्रचार करण्यात आला.

टॅग्स :Fani Cyclone फनी वादळOdishaओदिशा