Pune Corona News: सोमवारी शहरात कोरोनाबाधितांची संख्या ५० च्या आत; केवळ ४५ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 17:47 IST2021-11-22T17:46:58+5:302021-11-22T17:47:40+5:30
दिवसभरात ३ हजार २२२ जणांची तपासणी करण्यात आली.

Pune Corona News: सोमवारी शहरात कोरोनाबाधितांची संख्या ५० च्या आत; केवळ ४५ नवे रुग्ण
पुणे : शहरात सोमवारी ४५ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, ८५ कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार २२२ जणांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत बधितांची टक्केवारी १.३९ टक्के आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरातील एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. मात्र पुण्याबाहेरील २ जण दगावले आहेत. शहरातील विविध रूग्णालयांत सध्या ९८ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ७७ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.
शहरात आतापर्यंत ३६ लाख ५१ हजार ५११ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातले ५ लाख ६ हजार ६ जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी ४ लाख ९६ हजार ८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरात ९ हजार ९६ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ८२७ इतकी आहे.