शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"आता भावी मुख्यमंत्री नको पाच अक्षरी नाव हवे", फडणवीसांच्या उपस्थितीत टाळ्यांचा कडकडाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 15:35 IST

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हवेत त्यांनी हात वर करा सांगताच, अर्ध्या सभागृहाने हात वर केले

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री पदावर भाजपकडून सातत्याने दावा सांगितला जात आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून आमचे खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून विविध ठिकाणी बॅनर झळकल्याचे पाहायला मिळाले. खरंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हायला शंभर टक्के आवडेल असे म्हणत आपली इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर दुसरीकडे नागपूरमध्येही देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार, अशा आशयाचे बॅनर झळकले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा अजूनही सुरु आहेत. अशातच पुण्यातील एका कार्यक्रमात 'आता भावी मुख्यमंत्री नको पाच आकडी नाव हवे' असं वक्तव्य केल्यानंतर   टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या वक्तव्याला एकप्रकारे अनुमोदन मिळाल्याचे दिसून आले आहे. 

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत. एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात फडणवीस उपस्थित असताना हा किस्सा घडला आहे. लोकांच्या मनातले मुख्यमंत्री असा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करताना इथेच सर्व्हेक्षण घ्या. आणि ज्यांना ते मुख्यमंत्री हवेत त्यांनी हात वर करा असे एका कार्यक्रमात शैक्षणिक संस्थेच्या कार्याध्यक्षानी सांगितले. त्याच क्षणी अर्ध्या सभागृहाने हात वर केले. हे वक्तव्य एकीकडे करताना कार्याध्यक्षानी आणखी एक गुगली टाकली.  नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचे सक्षम नेतृत्व कोण करू शकेल तर ते देवेंद्र फडणवीस. त्यामुळे आता भावी मुख्यमंत्री नको पाच आकडी नाव हवे असे त्यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या वक्तव्याला एकप्रकारे अनुमोदन मिळाले. फडणवीस यांनी केवळ स्मित हास्य करून वेळ मारून नेली.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणSocialसामाजिकBJPभाजपा