आता पाेलिसांना रिक्षा करता येणार स्कॅन ; सुरक्षेच्या दृष्टीकाेनातून आरटीओचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 17:12 IST2019-03-18T17:11:31+5:302019-03-18T17:12:41+5:30
सर्व परवानाधारक रिक्षांना क्यू- आर काेड लावण्याचा विचार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) सुरु आहे.

आता पाेलिसांना रिक्षा करता येणार स्कॅन ; सुरक्षेच्या दृष्टीकाेनातून आरटीओचा प्रयत्न
पुणे : खाेट्या नंबरप्लेट लावून रिक्षा चालविण्याचे प्रकार समाेर आल्याने तसेत शहरात अनधिकृत, अवैध प्रवासी वाहतूक केली जात असल्याने सर्व परवानाधारक रिक्षांना क्यू- आर काेड लावण्याचा विचार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) सुरु आहे. हा क्यू आर काेड लावल्यानंतर रिक्षाची सर्व माहिती पाेलिसांना उपलब्ध हाेणार आहे.
सध्या रिक्षांची संख्या शहरात वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रिक्षाला खाेटी नंबरप्लेट लावण्याचे प्रकार समाेर आले आहेत. त्यातच अवैध प्रवासी वाहतूकही शहरातील अनेक भागांमध्ये केली जाते. शहरात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना रिक्षा आणि इतर पर्यायांकडे वळावे लागते. काहीजण परवाना न घेता रिक्षा चालवत असल्याचे समाेर आले आहे. अशा रिक्षाचालकांकडून प्रवाशांशी वाद घालणे, मिटरप्रमाणे भाडे न आकारणे यासांरखे प्रकार घडत असून आरटीओच्या या निर्णयामुळे असे प्रकार कमी होऊन परवानाधारक चालकांना याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रिक्षा चालकाच्या सीटमागे हा क्यू- आर कोड लावण्यात येईल. परिणामी वाहतूक पोलिसांनाही तपासादरम्यान सहजपणे रिक्षाची माहिती उपलब्ध होणार आहे.
वाहतूक पाेलिसांनी नुकताच काेंढवा परिसरात नाे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिक्षाला जॅमर लावून कारवाई केली. दाेन दिवस झाले तरी ती रिक्षा साेडवण्यासाठी काेणी आले नाही. वाहतूक पाेलिसांनी रिक्षावर असलेल्या नंबरच्या आधारे त्याच्या मालकाचा शाेध घेण्याचा प्रयत्न केला असता रिक्षाचा नंबर हा एका चारचाकीचा असल्याचे समाेर आले. त्यामुळे आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पाेलिसांनी दिली.
क्यू - आर कोड संदर्भात आरटीओ प्रशासनाशी नूकतीच चर्चा करण्यात आली. आरटीओकडून शहरातील सर्व परवानाधारक रिक्षांना क्यू- आर कोड लावण्यात आल्यास वाहतूक पोलिसांनाही कोड स्कॅनकरुन माहिती मिळणे सोपे होणार आहे.
- पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक
रिक्षांना क्यू - आर कोड लावण्यासंदर्भात प्राथमिक पातळीवर काम सुरू आहे. यासाठी ’आरटीए’च्या परवानगीची आवश्यकता आहे. पुढील काही दिवसात याबाबत निर्णय घेण्यात येईल.
- संजय राऊत, प्रादेशिक परिवहन अधिकारी