शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आता मुठा नदीसुद्धा म्हणतेय मी टू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 16:51 IST

सध्या पुण्यातील मुठा नदी सुद्धा मी टू म्हणत तिच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फाेडत आहे. भिडे पुलावर एक फ्लेक्स लावण्यात आला असून या फ्लेक्सच्या माध्यमातून मुठा नदीवर वर्षानुवर्षे हाेत असलेल्या अत्याचाराला वाचा फाेडण्यात येत आहे.

पुणे : काही महिन्यापूर्वी मी टू या चळवळीने अख्खा देश ढवळून निघाला हाेता. या चळवळीच्या माध्यमातून अनेक महिला पुढे आल्या. त्यांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फाेडली. सध्या पुण्यातील मुठा नदी सुद्धा मी टू म्हणत तिच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फाेडत आहे. भिडे पुलावर एक फ्लेक्स लावण्यात आला असून या फ्लेक्सच्या माध्यमातून मुठा नदीवर वर्षानुवर्षे हाेत असलेल्या अत्याचाराला वाचा फाेडण्यात येत आहे. सध्या हा फ्लेक्स येथून जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.     हॅश मी टू. गेली कित्येक दशकं हे माझ्या संमतीशिवाय हाेत आलंय. कधी माझ्या गर्भातुनवाळु उपसा तर कधी घरघरातील सांडपाणी, कधी निर्माल्या्च्या रुपात कचरा तर कधी असभ्य, असंस्कृतांची मनमानी. हाे, मी पिडीत आहे. असे या फ्लेक्सवर लिहीण्यात आले आहे. तसेच नदी प्रदुषित अथवा काेणतेही सार्वजनिक जलप्रवाह प्रदुषण करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता कलम 277 च्या अंतर्गत 3 महिने कारावास, दंड किंवा दाेन्ही या कलमास पात्र राहिल असेही या फ्लेक्सवर लिहून साैजन्य माय लाॅयर पुणे यांना देण्यात आले आहे. हा फ्लेक्स नेमका काेणी लावला हे माहित नसले तरी यावर लिहीण्यात आलेला संदेश पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. 

    सध्या मुठा नदीबराेबरच इतर नद्यांची अवस्था पाहता ती अत्यंत बिकट आहे. मुठेच्या पात्रात ठिकठिकाणी कचऱ्याची बेटे तयार झाली आहेत. नदीपात्रात सांडपाणी साेडण्यात येत असल्याने पाणी माेठ्याप्रमाणावर प्रदूषित झाले आहे. नदीतील अनेक माशांच्या प्रजाती या नष्ट झाल्या आहेत. नदीतील संपूर्ण नैसर्गिक अधिवासच धाेक्यात आला आहे. महापालिकेकडून वेळाेवेळी निर्माल्य हे नदीत न फेकता निर्माल्य कलशात जमा करण्याचे आवाहन करण्यात येत असते. परंतु काही नागरिक याकडे दुर्लक्ष करत नदीतच निर्माल्य टाकत असतात. त्यामुळे नदीचे माेठ्याप्रमाणावर प्रदूषण हाेत असते. पालिका किंवा सरकारकडून नदीच्या प्रदूषणाकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने सध्या शहरातील नद्यांचे रुपांतर गटारीत झाले आहे.

टॅग्स :mula muthaमुळा मुठाriverनदीPuneपुणेpollutionप्रदूषण