शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

अाता मैदानांनाही हेरिटेजचा दर्जा द्यावा लागेल : सचिन तेंडुलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 5:16 PM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मिशन यंग अॅण्ड फिट इंडिया राबविण्यात येणार अाहे. या मिशनच्या उद्घाटन साेहळ्याला सचिन तेंडुलकर यांना अामंत्रित करण्यात अाले हाेते. यावेळी सुनंदन लेले यांनी सचिन यांची मुलाखत घेतली.

पुणे : अापल्याकडील अनेक शाळांना मैदाने नाहीत. त्यामुळे विद्यार्थी खेळांपासून वंचित राहत अाहेत. ज्या गतीने अापल्याकडील मैदाने कमी हाेत अाहेत, त्याचा विचार करता मैदानांनाही हेरिटेजचा दर्जा द्यावा लागेल अशी खंत सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केली.     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मिशन यंग अॅण्ड फिट इंडिया राबविण्यात येणार असून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल तसेच स्वतःच्या अाराेग्याबद्दल जनजागृती करण्यात येणार अाहे. या मिशनच्या उद्घाटन साेहळ्यात सचिन यांच्या मुलाखतीचे अायाेजन करण्यात अाले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरु डाॅ. एन. एस उमराणी, प्र-कुलसचिव डाॅ. अरविंद शाळीग्राम, विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक विभागाचे संचालक डाॅ. दीपक माने तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष अाणि क्रीडा संचालक उपस्थित हाेते. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी सचिन यांची मुलाखत घेतली.     सचिन तेंडुलकर यांनी अापल्या मुलाखतीतून अनेक पैलूंना हात घातला. अापल्या अायुष्यातील खेळाचे महत्त्व त्यांनी अाधाेरेखित केले. खेळामुळे अायुष्यात अनेक बदल झाले असेही त्यांनी अावर्जून नमूद केले. शाळेच्या मैदानांबाबत विचारले असता ते म्हणाले, अनेक शाळांना मैदान नसते, त्यामुळे विद्यार्थी खेळापासून वंचित राहतात. ज्या शाळांना मैदाने नाही त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना इतर शाळांनी मैदान उपलब्ध करुन द्यायला हवे. खेळाचे महत्त्व शाळेपासूनच विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवले पाहिजे. त्याचबराेबर शिक्षणामध्ये खेळ या विषयाचा समावेश करायला हवा. असा विषय अभ्यासक्रमात ठेवल्यास अनेक चांगले बदल विद्यार्थ्यांमध्ये बघायला मिळतील.     मुलांमधील निराशेबाबत बाेलताना तेंडुलकर म्हणाले, तुम्ही जसा विचार करता तसे परिणाम तुम्हाला मिळत असतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करायला हवा. भारतीयांनी अापले विचार बदलले तरच अापल्याला चांगले परिणाम पाहायला मिळतील. लहान मुलांनी मस्ती करणे, मित्रांसाेबत वेळ घालवणे, दंगा करणे तितकेच अावश्यक अाहे. अापली शक्ती याेग्य गाेष्टींमध्ये अापण गुंतवायला हवी. मला माझ्या घरच्यांनी खेळासाठी नेहमीच सपाेर्ट केला. तंदुरस्त राहण्यासाठी खेळ हे अावश्यक अाहेत. केवळ तरुणांनीच नाही तर सर्वांनीच खेळ खेळायला हवेत. त्याचबराेबर नवनवीन खेळही अापण शाेधून काढले पाहिजे. खेळातूनच सर्वांच एकिकरण हाेत असतं. सध्या विविध साेशल माध्यम अाली अाहेत. ती जेव्हा नव्हती तेव्हा अापलं अायुष्य तणावमुक्त हाेतं.     मेहनतीबाबत बाेलताना सचिन म्हणाले, केव्हाही अायुष्यात शाॅर्टकट घेऊ नका. त्यांनी यावेळी त्यांच्या शाळेतील पहिल्या मॅचचे उदाहरणही सांगितले. पेपरमध्ये नाव येण्यासाठी त्यावेळी 30 रण काढावे लागत असत. सचिन यांनी 24 काढले हाेते. स्काेअर लिहिणाऱ्याने त्यांचे रण 30 लिहिले. त्यावेळी त्यांच्या सरांनी त्यांनी किती रण काढले असे विचारले असता त्यांनी प्रामाणिकपणे 24 काढल्याचे सांगितले. परंतु पेपरात नाव येण्यासाठी स्काेअर लिहिणाऱ्याने तीस लिहिले अाणि सचिन यांनी त्याला विराेध न केल्याने त्यांचे प्रशिक्षक त्यांना म्हणाले की, पेपरात नाव यायचे असेल तर स्वतःच्या जीवावर रण काढले पाहिजेत. त्यामुळे यशासाठी कुठलाही शार्टकट न पत्करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. तसेच अापण ज्यावेळी अापल्या समस्येवर लक्ष न देता तिच्या उपायावर लक्ष केंद्रीत करु त्यावेळी अापल्याला मार्ग नक्की सापडेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच अापल्या अायुष्यातील क्रिकेटचे महत्त्व सांगताना क्रिकेट म्हणजे माझ्या अायुष्यात अाॅक्सिजन अाहे असेही त्यांनी अावर्जुन नमूद केले. 

टॅग्स :PuneपुणेSachin Tendulkarसचिन तेंडूलकरPune universityपुणे विद्यापीठSportsक्रीडा