अाता अाेपन लाॅनवर सुद्धा सिनेमाचं स्क्रिनिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 20:12 IST2018-12-17T20:01:50+5:302018-12-17T20:12:43+5:30
पुण्यातील काेरेगाव पार्क परिसरात नुकताच मुव्हिज अॅण्ड चिल फेस्टिवलचे अायाेजन करण्यात अाले हाेते. तीन दिवस चाललेल्या या फेस्टिवलमध्ये एका लाॅनवर माेकळ्या वातावरणात सिनेमे दाखविण्यात अाले.

अाता अाेपन लाॅनवर सुद्धा सिनेमाचं स्क्रिनिंग
पुणे : गावाकडे असणाऱ्या टुरिंग टाॅकिजची कथा सर्वांना माहितच असेल. माळरानावर पडदा लावून त्यावर सिनेमा दाखविण्यात येताे. अशीच काहीशी काॅन्सेप्ट अाता पुण्यात देखिल रुजू पाहत अाहे. पुण्यातील काेरेगाव पार्क परिसरात नुकताच मुव्हिज अॅण्ड चिल फेस्टिवलचे अायाेजन करण्यात अाले हाेते. तीन दिवस चाललेल्या या फेस्टिवलमध्ये एका लाॅनवर माेकळ्या वातावरणात सिनेमे दाखविण्यात अाले. लाॅनच्या एका बाजूला पडदा लावून प्रेक्षकांना बसण्यासाठी गाद्यांची व्यवस्था करण्यात अाली हाेती. या फेस्टिवलला तरुणांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला.
पुण्यात पहिल्यांदाच या अाेपन सिनेमा फेस्टिवलचे अायाेजन करण्यात अाले हाेते. पुण्यातील काेरेगाव पार्क तरुणाईसाच्या अाकर्षणाचे ठिकाण अाहे. काेरेगाव पार्क मधील एका हाॅटेलच्या लाॅनवर हा फेस्टिवल झाला. 14 ते 16 डिसेंबर या कालावधीत चाललेल्या या फेस्टिवलमध्ये विविध विषयांवरचे इंग्रजी सिनेमे दाखविण्यात अाले. या फेस्टिवलसाठी शुल्कही कमी ठेवण्यात अाले हाेते. पहिल्यांदाच असा फेस्टिवल पुण्यात हाेत असल्याने प्रेक्षकांचा याला चांगला प्रतिसाद मिळाला. 28 ते 30 डिसेंबर दरम्यान पुन्हा एकदा या फेस्टिवलचे अायाेजन करण्यात येणार असून यातही विविध सिनेमे दाखविण्यात येणार अाहेत. शहरात अायटी हब अाणि माेठ माेठ्या शैक्षणिक संस्था असल्याने तरुणांची संख्य लक्षणीय अाहे. त्यांना अाकर्षित करण्यासाठी विविध नवीन उपक्रम शहरात राबविण्यात येत अाहेत. त्याचाच एक भाग म्हणजे हे फेस्टिवल. याचबराेबर नुकताच शहरात फुड फेस्टिवलचे देखील अायाेजन करण्यात अाले हाेते. यात विविध प्रदेशातील पदार्थांचा अास्वाद पुणेकरांना घेता अाला.