शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

अबब..! पुण्यातील मार्केट यार्डात १४०० ग्रॅमचे हनुमानफळ दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 21:05 IST

हनुमानफळ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

ठळक मुद्देगेल्या पंधरा दिवसांपासून मार्केट यार्डातील हनुमानफळाची आवक सुरु

पुणे : नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन परिसरातून गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये रविवारी हनुमानफळांची आवक झाली. तब्बल १ किलो ४०० ग्रॅमचे एक हनुमानफळ पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.गेल्या पंधरा दिवसांपासून मार्केट यार्डातील हनुमानफळाची आवक सुरु झाली आहे़  सुरुवातीच्या काळात ही आवक तुलनेने कमी होती. आता ही आवक वाढू लागली आहे. रविवारी ५० क्रेट इतकी हनुमानफळाची आवक झाली़ एका क्रेटमध्ये १५ ते १६ किलो इतकी हनुमानफळे असतात़ उच्च दर्जाच्या फळास ८० ते १०० रुपये, मध्यम दर्जाच्या फळास ५० ते ७० रुपये आणि दुय्यम दर्जाच्या मालास ४० रुपये प्रतिकिलोस दर मिळाला़  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन चांगले आहे़  चांगला पाऊस झाल्यामुळे मालाचा दर्जा चांगला आहे़  शहरासह उपनगरातील स्ट्रॉलविक्रेते आणि घरगुती ग्राहकांकडून या फळास मागणी होती़याबाबत व्यापारी संतोष ओसवाल यांनी सांगितले की, हनुमान फळ हे रामफळ व सीताफळ यांच्या जातीचेच एक फळ आहे. हनुमान फळ हे सीताफळाप्रमाणेच असले तरी आकाराने ओबडधोबड असते. ते फळ चवीला अननसाप्रमाणे आंबट-गोड असून त्याचा गर आइस्क्रीमसारखा मऊ असतो, त्यामुळे तो चमच्याने खाता येतो. हनुमान फळात सीताफळापेक्षा खूप कमी बिया असतात. एका हनुमान फळाचे वजन १०० ग्रॅमपासून दीड किलोपर्यंत असते. एका झाडाला सुमारे ४० किलो वजनाची फळे लागतात. फळाचा हंगाम नोव्हेंबर ते जानेवारी असा असतो असेही ओसवाल यांनी नमूद केले़---हनुमानफळापासून चांगले उत्पन्नगेल्या तीन-चार वर्षांपासून आमच्या शेतात लागवड केलेले हनुमानफळ मार्केटयार्डात विक्रीस पाठवित आहे़ त्याला प्रतिकिलोस १०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे़ आम्ही २ एकर क्षेत्रावर लागवड केली आहे़  गेल्यावर्षी अडीच लाख रुपयांचे उत्पादन मिळाले होते यंदा त्यामध्ये वाढ होवून पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे़़- नंदू आण्णा गवळी, शेतकरी राशीन (कर्जत तालुका)

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्ड