जलप्रदूषण प्रकरणी पुणे महापालिकेला नोटीस

By राजू हिंगे | Updated: December 28, 2024 16:21 IST2024-12-28T16:20:51+5:302024-12-28T16:21:40+5:30

पुणे : महापालिकेकडून रोज ९० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) सांडपाणी प्रक्रिया न करता थेट मुळा आणि मुठा नदीत सोडले ...

Notice to Pune Municipal Corporation in water pollution case | जलप्रदूषण प्रकरणी पुणे महापालिकेला नोटीस

जलप्रदूषण प्रकरणी पुणे महापालिकेला नोटीस

पुणे : महापालिकेकडून रोज ९० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) सांडपाणी प्रक्रिया न करता थेट मुळा आणि मुठा नदीत सोडले जात आहे. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडल्यामुळे जलप्रदूषण होऊन माशांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुणे महापालिकेला नोटीस बजावली आहे.

महापालिकेचा नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि नदी परिसराची मंडळाच्या आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. त्या वेळी नदीच्या दोन्ही बाजूंना मृत मासे आढळून आले. नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या नजीक तीन नाल्यांमधून येणारे सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. यामुळे नदीतील माशांचा मृत्यू झाला आहे. नाल्यातील सांडपाणी काळ्या रंगाचे, दुर्गंधीयुक्त असून, त्याचे पीएच मूल्य ६ ते ७ आहे. याच बरोबर जुना नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पाडण्यात आला असला, तरी नवीन प्रकल्पाचे काम अद्याप पूर्ण झाले नसून, तो सुरू झालेला नाही. या प्रकल्पाला अजून वीजपुरवठ्याची पर्यायी सोय करण्यात आलेली नाही.

नोटीशीला उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाई

जल प्रदूषण केल्याप्रकरणी पुणे महापालिकेला नोटीस बजाविण्यात आली असून, नियमांची पूर्तता करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. शहरातील १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा सादर करण्याची सूचनाही महापालिकेला केली आहे. महापालिकेने नोटिशीला उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

Web Title: Notice to Pune Municipal Corporation in water pollution case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.