शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

उजनीतून पाण्याचा एकही थेंब सोलापूरला जाणार नाही, नदीत सोडलेले पाणीही बंद पाडणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 13:25 IST

इंदापुर शेतकरी कृती समितीचा इशारा

ठळक मुद्देसोलापुरला आँक्टोबर नंतर अनाधिकृतपणे पाणी दिले जाते, ही बाब नियमबाह्य

कळस: उजनी धरणातून इंदापूरला दिलेल्या पाच टीएमसी पाण्याला सोलापुरच्या लोकप्रतिनिंधीनी विरोध केल्याने सोलापूरलाही ऑक्टोबरनंतर धरणातून पाण्याची तरतूद नसल्याने एकही थेंब जाऊ दिला जाणार नाही. सध्या नदीतून देण्यात आलेले पाणीही बंद पाडण्यात येईल. असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांनी दिला आहे. इंदापूरात कळस येथे चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी पाटील म्हणाले,  उजनीतून इंदापूरच्या अवर्षणग्रस्त भागाला देण्यात येणारे पाणी हे आमच्या हक्काचे पाणी आहे. त्यास सोलापूरमधून होणारा विरोध हे राजकीय द्वेषापोटी रचलेले षडयंत्र आहे. उजनी धरणामुळे तालुक्यातील विस्थापित झालेल्या लोकांना पाणी मिळत नसल्याची वस्तूस्थिती आहे. मात्र सोलापूरला आँक्टोबरनंतर अनाधिकृतपणे पाणी दिले जाते, ही बाब नियमबाह्य आहे. सध्या सोलापूरला नदीतून देण्यात येणारे पाणीही बंद पाडण्यात येणार आहे. सोलापूरकरांनी आमची खोडी काढली आहे. त्यामुळे आम्ही गप्प बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

खडकवासला धरणसाखळीतील पाणी पुण्याच्या वाढत्या पाणी मागणीमुळे आम्हाला पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. परंतू त्यांनी वापरलेल्या पाण्यापैकी सुमारे ८० टक्के सांडपाणी हे भिमा नदीत येत आहे. हेच सांडपाणी आम्ही शेतीसिंचनासाठी मागणी करत आहोत. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पाठपुरावा करुन शेटफळगढे उपसा सिंचन योजनेस मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. मात्र जलसंपदा मंत्र्यांनी हीच सिंचन योजना रद्द करत असल्याचे जाहीर केले. हा प्रकार म्हणजे ताटात वाढलेला घास परत घेण्यासारखा आहे. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

तालुक्यातील ६० हजार एकर क्षेत्राला याचा फटका बसणार आहे. उजनीतून इंदापूरकरांना पाणी देण्यास विरोध करणारे सोलापूरातील लोकप्रतिनीधी उजनीतून बोगस पाणी पळवित असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे सोलापूरकरांना नदीतून देण्यात येणारे पाणी बंद पाडण्यात येणार आहे  याशिवाय आम्ही न्यायालयात आमच्या हक्क्याच्या पाण्यासाठी लढा देणार असल्याचे ते म्हणाले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूरUjine Damउजनी धरणDamधरणGovernmentसरकार