करावं तेवढं कौतुक कमीच! जन्मदात्री'ने कचराकुंडीत फेकले अन् महिला पोलीस अधिकाऱ्याने जीवदान दिले 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 07:02 PM2021-02-18T19:02:06+5:302021-02-18T19:03:30+5:30

एक अज्ञात मातेने आपल्या केवळ एक दिवसाच्या बाळाला कात्रज घाटातील रस्त्याच्या कडेला कचराकुंडीत टाकले...

Not much to appreciate! mother 'thrown baby in the dustbin by a female police officer who gave her life | करावं तेवढं कौतुक कमीच! जन्मदात्री'ने कचराकुंडीत फेकले अन् महिला पोलीस अधिकाऱ्याने जीवदान दिले 

करावं तेवढं कौतुक कमीच! जन्मदात्री'ने कचराकुंडीत फेकले अन् महिला पोलीस अधिकाऱ्याने जीवदान दिले 

Next

धनकवडी : रामाला वनवासात पाठवल्याबद्दल कैकयीची निंदा करताना भरताने म्हटले आहे, 'माता नसे तू वैरिणी'. अशीच घटना कात्रज घाटामध्ये घडली. एक अज्ञात मातेने आपल्या केवळ एक दिवसाच्या बाळाला कात्रज घाटातील रस्त्याच्या कडेला कचराकुंडीत टाकले. परंतु 'देव तारी त्याला कोण मारी' या ऊक्ती प्रमाणे एका महिला सहायक पोलिस निरीक्षकांनी तातडीने येऊन बाळाचे प्राण वाचवले. या घटनेने 'माय मरो पण मावशी जगो' या मराठीत प्रचलीत असलेल्या म्हणीचा नुकताच प्रत्यय आला.  

सिद्धेश्वर ढफळे व संकेत गाणार हे दोघे सायकलस्वार सकाळी सात वाजता कात्रजच्या घाटातून चालले होते. त्यावेळी अचानक त्यांना रस्त्याच्या कडेला कचरापेटी मध्ये बाळाला दुपट्ट्यामध्ये गुंडाळून टाकलेले आढळले. त्यांनी लगेच फोन करून ही गोष्ट पोलीसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक मधुरा कोराणे आपल्या दुचाकीवरून घटना स्थळी पोहोचल्या व त्यांनी बाळाला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. बाळाचे प्राण वाचले असून बाळ ठिकठाक आहे. 

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी ही माहिती लोकमतला दिली. आसपासच्या भागातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून बाळाला टाकून जाणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. मधुरा कोराणे बाळाला दुचाकीवरून  रूग्णालयात घेऊन जातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. महिला पोलिस अधिकारी मधुरा कोराणे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधाना बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Web Title: Not much to appreciate! mother 'thrown baby in the dustbin by a female police officer who gave her life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.