शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
2
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
4
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
5
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
6
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
7
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
8
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
9
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
10
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
11
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
12
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
13
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
14
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
15
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
16
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
17
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
18
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
19
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
20
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली

शिक्षक प्रशिक्षणासाठी नॉर्वेचे सहकार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 02:40 IST

शिक्षणशास्त्र विभागासह संयुक्त उपक्रम; दीड कोटीची करणार मदत

पुणे : उत्तर युरोपातील देशांमध्ये शिक्षणाच्या अध्यापन पद्धती, शिक्षक प्रशिक्षण याबाबत वेगवेगळे प्रयोग राबविले जात आहेत. विशेषत: नॉर्वेमध्ये शिक्षण सुधारणांसाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात आलेले आहेत. या प्रयोगांतून आलेले निष्कर्ष, अनुभव यांची नार्वेचे साऊथ-ईस्ट विद्यापीठसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभाग यांच्या देवाणघेवाण होणार आहे.शिक्षण प्रशिक्षण, अध्यापन, अभ्यास पद्धती याबाबत आदान-प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, या उपक्रमासाठी साऊथ-ईस्ट विद्यापीठाकडून शिक्षणशास्त्र विभागाला दीड कोटी रुपयांचे अनुदान मिळणार असल्याची माहिती शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली.शिक्षणशास्त्र विभागातील विद्यार्थी, शिक्षक नार्वेला भेट देऊन तिथल्या शिक्षण पद्धती व शिक्षणात करण्यात आलेल्या प्रयोगांचा अभ्यास करणार आहेत. त्याचबरोबर, साऊथ-ईस्ट विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येऊन अभ्यास करणार आहेत. या संयुक्त उपक्रमातून गुणवत्तापूर्ण संशोधन व प्रशिक्षणासाठी मोठी मदत होईल.आॅक्टोबरमध्ये जाणार पहिली टीमसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागातील पहिली टीम आॅक्टोबर २०१८मध्ये नॉर्वेला जाणार आहे.यामध्ये शिक्षणशास्त्र विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी यांचा समावेश असणार आहे.उत्तर युरोपीय देशांतील माध्यमिक व प्राथमिक शिक्षण जगात नावाजलेले आहे. साऊथ-ईस्ट नॉर्वे विद्यापीठातील शिक्षण प्रशिक्षणाची पद्धत या प्रकल्पाद्वारे समजून घेण्यास मदत होणार आहे. शिक्षण प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयोगी ठरेल. तसेच, नार्वेमध्ये बहुसांस्कृतिक शिक्षक तयार करण्यास शिक्षणशास्त्र विभागाकडून मदत केली जाणार आहे.- डॉ. संजीव सोनावणे,विभागप्रमुख, शिक्षणशास्त्र विभागसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १९९०मध्ये शिक्षणशास्त्र विभाग सुरू झाला. सध्या या विभागामार्फत एमएड, एमए एज्युकेशन व बीएस्सी बीएड आदी अभ्यासक्रम चालविले जात आहेत. सध्या आंबेडकर भवन येथे असलेल्या शिक्षणशास्त्र विभागाचे लवकरच सेट भवन येथील स्वतंत्र इमारतीमध्ये स्थलांतर होणार आहे.

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेuniversityविद्यापीठEducationशिक्षण