Pune: हात उसने पैसे परत न केल्याने चार दिवस ठेवले डांबून; सहा जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 02:44 PM2022-01-15T14:44:37+5:302022-01-15T14:47:16+5:30

टोळक्याने तरुणाला सिंहगड रस्त्यावरून अपहरण करुन चार दिवस डांबून ठेवल्याचा प्रकार समोर

non repayment of loan man locked 4 days charges filed against six persons sinhgad road police | Pune: हात उसने पैसे परत न केल्याने चार दिवस ठेवले डांबून; सहा जणांवर गुन्हा दाखल

Pune: हात उसने पैसे परत न केल्याने चार दिवस ठेवले डांबून; सहा जणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

धायरी: हात उसने दिलेले पैसे परत न केल्याच्या कारणावरुन एका टोळक्याने तरुणाला सिंहगड रस्त्यावरून अपहरण करुन चार दिवस डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. सनी सुनिल छजलाणी (वय:३१, रा. केशवनगर, मुंढवा) आणि सलमान समीर शेख (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच पक्या, अभिजित, मयुर, शादाब (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) अशा इतर चार जणांचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत राहुल अशोकलाल चव्हाण (वय ३१, रा. डुडुळगाव, मोशी, आळंदी) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल चव्हाण व त्यांचा भाऊ गोविंद चव्हाण यांनी व्यवसायासाठी सनी छजलाणी याच्याकडून हात उसने पैसे घेतले होते. हे पैसे परत न केल्याच्या कारणावरुन त्यांच्यात वाद सुरु झाला होता. राहुल हा १० जानेवारी रोजी क्युबाना कॅफे येथे असताना सनी इतरांना घेऊन तेथे आला. त्याने राहुल याला मारहाण करुन जबरदस्तीने त्याचे अपहरण करुन केशवनगर भागातील आपल्या घरी नेले. तेथे त्याला डांबून ठेवले.

त्या ठिकाणी मारहाण करुन पैसे परत नाही केले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. वडगांव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज कॅम्पस येथील क्युबाना कॅफे येथून गोयलगंगा येथे १० ते १४ जानेवारी दरम्यान हा प्रकार घडला आहे. १४ जानेवारी रोजी सुटका केल्यानंतर राहुल चव्हाण याने पोलिसांकडे तक्रार केली असून सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले पुढील तपास करीत आहेत.

Web Title: non repayment of loan man locked 4 days charges filed against six persons sinhgad road police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.