शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनाच्या दिवशीही मुठा नदीचं पात्र कोरडंच...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 16:52 IST

पुणे शहरातील गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाकडुनही खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी शनिवारपर्यंत पुरेसे पाणीच सोडण्यात आले नव्हते.

ठळक मुद्देन्यायालयाकडून डीजेवर बंदी घातल्यामुळे उत्साही मंडळांनाच आधीच चांगलाच दणका पाणीच सोडले गेले नसल्याने शहर- उपनगरातील गणेश भक्त व मंडळे सुद्धा आता तीव्र संताप व्यक्त

खडकवासला: यंदाच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सर्वोच्च व उच्च न्यायालयाकडून डीजेवर बंदी घातल्यामुळे उत्साही मंडळांनाच आधीच चांगलाच दणका बसला. त्यामुळे राज्यातच गणेश मंडळांमध्ये नाराजीचा सूर उमटला असतानाच पुणे शहरातील गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाकडुनही खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी शनिवारपर्यंत पुरेसे पाणीच सोडण्यात आले नव्हते. या पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता झाली होती.पण विभागाकडून रविवारी सकाळी मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले.       पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनाला यंदाच्या गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून पाणी सोडण्याचा विसर पडल्याचा गंभीर आरोपच खडकवासला मतदार संघाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी केला.  कोंडे म्हणाले, समस्त पुणेकर नागरिक व स्थानिक गणेशोत्सव मंडळांचे हे दुर्देवच म्हणावे लागेल. गणेश विसर्जनाच्या अगदी शेवटचे दिवसापर्यंत पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनाला मुठा नदीत पाणी सोडण्यासाठी जागच आली नाही.याला पाटबंधारे खाते तसेच पुणे महानगरपालिका देखील जबाबदार आहे. उच्च न्यायालयाचे व प्रशासनाचे जातक निबंर्धांमुळे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या आनंदावर  अगोदरच विरजण पडले असतानाच विसर्जनासाठी मुठा नदीत आवश्यक प्रमाणात पाणीच सोडले गेले नसल्याने शहर- उपनगरातील गणेश भक्त व मंडळे सुद्धा आता तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आजपर्यंत गणेश विसर्जनाच्या अगदी दोन तीन दिवस अगोदरच नदी पात्रात पाणी सोडले जात होते.मात्र, यंदा याचाही प्रशासनाला विसर पडला आहे.शनिवारी मध्यरात्रीपर्यंत नदीपात्रात पाणी सोडले गेले नाही तर शिवसेना पक्ष व गणेशोत्सव मंडळांच्या तीव्र रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही धावाधाव सुरू झाली.

टॅग्स :PuneपुणेGanesh Visarjanगणेश विसर्जनmula muthaमुळा मुठाDamधरणWaterपाणी