शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
6
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
8
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
9
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
10
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
11
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
12
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
13
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
14
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
15
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
16
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
17
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
18
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
19
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
20
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा

शेतीसाठीच्या उन्हाळी आवर्तनावर संक्रात : खडकवासला धरण पाणीसाठा अपुरा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 11:44 IST

खडकवासला धरणासाखळीतील एकूण पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तन देणे शक्य नसल्याचे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देपुणेकरांनंतर आता शेतकऱ्यांमध्ये रोष उन्हाळी आवर्तनाचा निर्णय २८ फेब्रुवारी अखेरपर्यंत धरणात किती साठा शिल्लक राहतो त्यावरपाणीसाठाच शिल्लक नसल्यामुळे पुणे शहरावरही पाणी कपात करण्याची वेळ येण्याची शक्यता

पुणे : पुणे शहरासह दौंड, इंदापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणासाखळीतील एकूण पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तन देणे शक्य नसल्याचे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच शिल्लक पाणी आता फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच वापरण्याचा निर्णय जलसंपदाच्या खडकवासला विभागाने घेतला असल्याचे समजते. पुणे शहराला २८ फेब्रुवारीपर्यंत लागणारे पाणी लक्षात घेता उर्वरित शिल्लक पाणी साठ्यातून  दौंड, इंदापूरसह सुमारे ३५ ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. उन्हाळी आवर्तनाचा निर्णय २८ फेब्रुवारी अखेरपर्यंत धरणात किती साठा शिल्लक राहतो त्यावर घेण्यात येतो. पुण्याला लागणारे पाणी बाजूला ठेवले तर फक्त अडीच टीएमसी पाणी धरणात शिल्लक रहाते. पुण्याच्या पाण्यात दर गुरूवारी कपात केल्यानंतरचा हा हिशोब आहे. या अडीच टीएमसी पाण्यात शेतीसाठी आवर्तन सोडणे अशक्य असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती मिळाली. पाण्याचे सगळे नियोजन आता पिण्यासाठी लागणारे पाणी लक्षात घेऊनच करण्यात येत आहे. त्यामुळेच शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तनावर संक्रात आली आहे. खडकवासला धरणासाखळीत (खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर) मागीलवर्षी याच काळात २०. १२ टीएमसी होते. यंदा फक्त १५.१२ टीएमसी आहे. त्यामुळेच जलसंपदाचे पाण्याचे नियोजन बिघडले आहे. पाणीसाठा कमी झाल्यामुळेच गेले महिनाभर जलसंपदाकडून पुणे शहराला पाणी कपात करण्याबाबत आग्रह धरण्यात येत होता. त्यासाठी तीन वेळा पंप बंद करण्याची कारवाईही करण्यात आली. पुणे शहराला ११.५० टीएमसी पाणी कोटा मंजूर आहे. याचा अर्थ त्यांनी दररोज फक्त ८९२ दशलक्ष लिटर पाणी धरणातून घ्यायचे आहे. प्रत्यक्षात मात्र पालिका रोज १ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी घेत आहे. इतके पाणी मिळूनही संपुर्ण शहराला व्यवस्थित पाणी पुरवठा करताना पालिकेची दमछाक होत आहे. मात्र आता पाणीसाठाच शिल्लक नसल्यामुळे पुणे शहरावरही पाणी कपात करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. तसे थेट जाहीर न करता दर गुरूवारी पाणी पुुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्यादिवशी १३५० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होणार आहे. आठवड्यातून एकदा १३५० म्हणजे महिनाभरात ५ हजार ४०० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होणार आहे. हा निर्णय महापालिका व जलसंपदा यांनी स्थानिक स्तरावर घेतला असल्यामुळे २५ जानेवारीला पुण्याच्या पाण्याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत जलसंपदा व महापालिका पदाधिकाºयांची मुबंईला होणारी बैठक झालीच नाही.   

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी