शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
5
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
6
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
7
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
8
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
9
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
10
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
11
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
12
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
13
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
14
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
15
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
16
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
17
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
18
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
19
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
20
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!

पाणीकपात होऊ देणार नाही, पुण्यासाठी वाढीव पाण्याची मागणी करणार - महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 2:15 AM

स्थानिक सुनावणीत जलसंपदा विभागाने काही आदेश दिला असेल. प्रशासन त्याविषयी पाहील; मात्र पुण्यात पाणीकपात होऊ देणार नाही. उलट, ११ गावांचा समावेश केल्यामुळे वाढीव पाण्याची मागणी करणार आहोत, त्यासाठी मंत्र्यांसमवेत मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.

पुणे : स्थानिक सुनावणीत जलसंपदा विभागाने काही आदेश दिला असेल. प्रशासन त्याविषयी पाहील; मात्र पुण्यात पाणीकपात होऊ देणार नाही. उलट, ११ गावांचा समावेश केल्यामुळे वाढीव पाण्याची मागणी करणार आहोत, त्यासाठी मंत्र्यांसमवेत मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. प्रशासनाच्या वतीनेही कोटा राज्य सरकारने ठरवून दिला असल्यामुळे त्यात कोणाला बदल करता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले.जलसंपदा विभागाकडे काही शेतक-यांनी पुण्यात जास्त पाणी वापरले जात असल्यामुळे शेतीला पाणी कमी मिळते, अशी तक्रार केली होती. तक्रारीच्या सुनावणीनंतर या विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे यांनी महापालिकेने पाण्यात साडेसहा टीएमसी पाणीकपात करावी, असा आदेश दिला.पाण्याचा कोटा ठरवून दिलेलापाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, ‘‘त्या सुनावणीत पालिकेच्या वतीने ग्रामपंचायतींना करावा लागणारा पाणीपुरवठा, लोकसंख्येत झालेली वाढ असे मुद्दे उपस्थित केले होते; मात्र ते दुर्लक्षित झाले. पुणे शहराला पाण्याची ११.५० टीएमसी हा कोटा सरकारने ठरवून दिला आहे. त्यामुळे अन्य कोणाच्या आदेशाने त्यात कपात वगैरे होणार नाही. कोटा वाढवून मिळावा, अशी मागणी प्रशासन सातत्याने करीत आहे. आता गावांच्या समावेशामुळे या मागणीची पूर्तता होईल, असे दिसते आहे.’’महापालिकेतील विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे यांनी २४ तास पाणी योजनेची गरज वाढावी, यासाठीच त्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली; त्याच दिवशी हा आदेशही दिला, अशी टीका केली. पाणीकपात झाली, की पुणेकरांची ओरड सुरू होईल व त्यांना आम्ही २४ तास पाणी देणार आहोत, असे सांगून योजना पुढे नेण्यात येईल, असा हा प्रकार असल्याचे सांगितले. आता सत्ताधारी भारतीय जनता पार्टी पुणेकरांच्याच पाण्याला कात्री लावू पाहत आहे, असे तुपे म्हणाले.महापालिकेला पाण्याचा कोटा राज्य सरकारने ठरवून दिला आहे. त्या आदेशाचे काय करायचे ते प्रशासन पाहील. आम्ही मात्र ११ गावांच्या समावेशामुळे पुुणे शहराचा पाण्याचा कोटा वाढवून मिळावा, अशीच मागणी सरकारकडे करून ती पूर्ण व्हावी,यासाठी प्रयत्न करणार आहोत.-मुक्ता टिळक, महापौर

टॅग्स :Puneपुणे