शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

सावधान! पुण्यात रस्तोरस्ती ' मृत्यू ' दबा धरून बसलाय..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 12:24 PM

एकेकाळी सुरक्षित मानले जाणारे पुणे अक्षरश: विस्कटून गेले आहे...

ठळक मुद्देसमन्वयाचा अभाव : पडलेले झाड काढण्यासाठी चार ते सहा हजारांची मागणीवादळी पावसात वाहनकोंडीची भरपडलेले झाड काढण्यासाठी चार ते सहा हजारांची मागणीवाहतूककोंडीमुळे रुग्णवाहिकेलाही रस्ता मिळणे अवघड

पुण्यात रस्त्यावरून अक्षरश: मृत्यू वाहतोय. तासाभराच्या पावसातच रस्त्याचा नाला होऊन अचानक दुचाकीसह तुम्ही वाहून जाऊ शकता. अचानक एखाद्या अदृश्य ओढ्याची ‘मीठी’ होऊन मोटारीची होडी होते. रस्त्यावरून जाताना झाडाच्या रूपाने मृत्यूच तुमचा ठाव घेऊ शकतो. वाहतूककोंडीमुळे रुग्णवाहिकेलाही रस्ता मिळणे अवघड होऊन रुग्ण दगावू शकतो. एकेकाळी सुरक्षित मानले जाणारे पुणे अक्षरश: विस्कटून गेले आहे. 

''विस्कटलेले पुणे तुंबते आहे. पुणेकर धास्तीत जगतोय. उल्हास आणि हर्ष घेऊन येणारा पाऊस पुणेकरांसाठी धोकादायक बनला आहे. गेल्या आठवड्यात मुलाला दहा मिनिटांत पोहोचतो म्हणून फोन करणारा एक पिता सिंहगड रस्त्यावर  वाहून गेला. याच ओढ्यात बुडून एका परिचारिकेचा मृत्यू झाला. दिवसभर रुग्णांची सेवा करून त्या घरी चालल्या होत्या. मात्र, त्यापूर्वीच काळाने ओढून नेले. सातारा रस्त्यावर केवळ आंबिल ओढाच नव्हे तर आजपर्यंत गटारी वाटणाºया नाल्यांनीही सोसायट्यांमध्ये राहणाºया नागरिकांना आपले रौद्र रूप दाखविले. रात्रीच्या अंधारात हजारो नागरिकांना साड्यांच्या दोºया करून शेजाºयांनी दुसºया मजल्यावर खेचून घेऊन त्यांचे प्राण वाचविले. आजही पावसाची चिन्हे दिसू लागली की त्यांच्याच नाही तर नातेवाईकांच्याही छातीत धस्स होते. अनेक जण पावसाचा अंदाज दिसला की आपल्या राहत्या घरातून कोठेतरी दुसरीकडे राहायला जातात. पुणेकरांवर आजपर्यंत ही स्थलांतराची वेळ आली नव्हती. अगदी कालच्या बुधवारचीच घटना. पीएमपीच्या ब्रेकडाऊन व्हॅनवर प्रचंड मोठे झाड कोसळले. तब्बल दीड ते दोन तास आतमध्ये अडकलेला चालक तडफडत होता. परंतु, वाहतूककोंडीमुळे त्याला मदत मिळू शकली नाही. भर रहदारीच्या टिळक रस्त्यावर ही घटना घडावी? पुणे ऐवढे असुरक्षित का झालेय? पाच हजार कोटींपेक्षा जास्त अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेला पुणेकरांची ही धास्ती घालविता येऊ नये? मान्य की यंदा पाऊस जास्त होतोय. पण महापालिकेची काही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आहे की नाही? या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय आज विस्कटलेले हे पुणे पुन्हा मार्गावर येणार नाही. ''

.......क्रेन पाठवली होतीकोणते झाड पडणार किंवा कोणते नाही, हे सांगता येत नाही. वादळी पावसात काही झाडे तग धरत नाहीत. अचानक अनेक ठिकाणी झाडे पडली. तरीही माहिती घेऊन शक्य त्या सर्व ठिकाणी पालिकेचे कर्मचारी पाठवले जात होते. काही ठिकाणी क्रेन पाठवली मात्र ती वाहतूककोंडीत अडकल्यामुळे वेळेवर पोहचू शकली नाही. - गणेश सोनुने, सचिव-वृक्ष प्राधिकरण समिती व आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख................

धोकादायक वृक्षांची पाहणे करणे शक्यशहरात मागच्याच आठवड्यात मोठा वादळी पाऊस झाला. त्यानंतर तरी वृक्ष प्राधिकरण समितीने शहरात पाहणी करणे गरजेचे होते. मात्र, हे काम केलेच जात नाही. आमच्या समितीचे सचिव हेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचेही प्रमुख आहेत. दोन्ही पदे त्यांच्याकडे आहेत तर वास्तविक अधिक कार्यक्षमेते काम होणे अपेक्षित आहे. - संदीप काळे, सदस्य, वृक्ष प्राधिकरण समिती...........मोठ्या फांद्या कटिंग केल्याशिवाय काढता येत नाही. झाड असेल तर मग त्यासाठी क्रेन लागते. वाहन विभागाला त्यासाठी कळवावे लागते. त्यांच्याकडूनच क्रेन मिळते. बुधवारच्या प्रसंगात आमचे कर्मचारी रात्रभर रस्त्यावर होते. त्यांना क्रेन मिळाली नाही, मात्र त्यामुळे काम थांबवून न ठेवता आम्ही मेट्रोचे काम सुरू होते त्या ठिकाणच्या ठेकेदार कंपनीच्या क्रेन वापरल्या.- प्रशांत रणपिसे, अग्निशमन विभाग प्रमुख......

पुणे : वादळी पावसात रस्त्यांवर तुटून पडलेल्या फांद्या काढण्यात पालिका प्रशासनाला बुधवारी पुर्ण अपयश आले. पाऊस थांबला, रस्त्यांवरचे वाहणारे पाणी ओसरले, मात्र फांद्या रस्त्यावर पडूनच राहिल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. आपत्ती व्यवस्थापन, वृक्ष प्राधिकरण, अग्निशमन व उद्यान या पालिकेच्या चारही विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे वाहनधारक वेठीला धरले गेले.

पावसाच्या वाहत्या पाण्याचा निचरा त्वरीत व्हावा म्हणून पावसाळीपुर्व कामांमध्ये गटारी, नाले यांची स्वच्छता करण्याचा समावेश केला जातो. त्याचप्रकारे वृक्ष प्राधिकरणाने पावसाळ्यापुर्वी शहरातील वृक्षांची पाहणी करून त्यातील धोकादायक वृक्ष किंवा त्यांच्या फांद्या काढून टाकणे अपेक्षित आहे. मात्र हे काम केलेच जात नाही. आठदहा दिवसांपुर्वी शहरात झालेल्या अशाच वादळी पावसानंतर तरी अशी पाहणी होणे आवश्यक होते, मात्र ती झालेली नाही.  प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात माळी तसेच वृक्ष अधिकारी अशी स्वतंत्र पदे आहे. किमान त्यांनी तरी त्यांच्या भागात फिरून पाहणी केली असती, नागरिकांकडे विचारणा केली असती तरी किमान काही घटना टाळणे शक्य होते. अशा प्रकारच्या कामाचा समावेशच आमच्या कामात नाही, कोणते झाड पडेल किंवा कोणती फांदी पडेल हे सांगताच येणे शक्य नाही अशा प्रकारचे उत्तरे या विभागाकडून दिली जातात. फांद्या पडल्यानंतर काय करायचे हेही पालिका प्रशासनात स्पष्ट नाही. उद्यान विभाग हे काम वृक्ष प्राधिकरणाचे असल्याचे सांगतात, वृक्ष प्राधिकरण त्यासाठी अग्निशमन विभागाचे साह्य लागते अशी माहिती देतात. अग्निशमन विभाग वाहन विभागाकडून क्रेन दिल्या जात नाहीत अशी तक्रार करत असते तर वाहन विभाग क्रेन भाडेतत्त्वावर घ्याव्या लागतात असे उत्तर देते. यातील एकाही खात्याचा दुसºया खात्याशी शुन्य समन्वय असल्याचे त्यांच्याकडे माहिती विचारल्यावर समोर आले........ आमच्याकडे उद्यानांची निगराणीकायद्यानेच आता वृक्ष प्राधिकरण समिती हा स्वतंत्र विभाग स्थापन झाला आहे. माळी तसेच वृक्ष अधिकारी ही पदे व त्यावरील कर्मचारीही त्यांच्याकडे वर्ग केले आहेत. उद्यानांची निगराणी ठेवण्याचे काम आमचे आहे. झाडांबाबतच्या सर्व गोष्टी आता या विभागाकडे आहेत. वृक्षांची पाहणी, धोकादायक असलेल्या फांद्या काढणे ही सर्व कामे याच विभागाकडून होत असतात. बुधवारी रात्री आमच्याकडेही तक्रारी येत होत्या. काही कर्मचारी काम करत होते - अशोक घोरपडे, उद्यान विभाग प्रमुख

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातRainपाऊसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाfire brigade puneपुणे अग्निशामक दल