शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नको असलेला पाहुणा; भाजपचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 21:21 IST

सरकारमध्ये निर्णय घेताना काँग्रेसला फारसे विश्वासात घेतले जात नाही...

पुणे:  महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमध्ये सुरु असलेली धुसफूस लपून राहिलेली नाही. त्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सातत्याने सत्तेतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेचे बाण सोडले जात आहे. त्यात धक्कादायक बाब म्हणजे पटोले यांनी मुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवत आहे असा गंभीर आरोप केला होता. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र, याच दरम्यान भाजपने काँग्रेस हा महाविकास आघाडी सरकारमध्ये नको असलेला पाहुणा बनला आहे अशा शब्दात टीकास्त्र सोडले आहे. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची मोठी अडचण होऊ लागली असून सध्याचे आघाडीचे सरकार आता तिघाडीचे सरकारच बनले आहे. तसेच सरकारमध्ये निर्णय घेताना काँग्रेसला फारसे विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे काँग्रेस हा सरकारमध्ये नको असलेला पाहुणा बनला आहे, असे टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.  

वादग्रस्त वक्तव्यामुळे काही दिवसांपासून महाविकास आघाडीत वांदग निर्माण झाले असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याने वाद आणखी उफाळून आला आहे. धोरणात्मक निर्णय घेताना काँग्रेसला विचारात घेतले जात नाही. त्यामुळे कॉंग्रेसची अवस्था बिकट बनली आहे असेही भंडारी म्हणाले.

विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या आमदारांचे निलंबन राजकीय हेतूने करण्यात आले असा आरोप करून भंडारी म्हणाले, सभापतीपदाची निवडणूक झाकण्याच्या प्रयत्नाच्या दृष्टीने भाजपचे आमदार अनुपस्थित राहावेत यासाठीच ही कार्यवाही करण्यात आली.परंतु, याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या हालचाली सुरु आहेत.---------------------------खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्री मंडळात स्थान न दिल्यामुळे प्रीतम मुंडे व पंकजा मुंडे नाराज असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे.परंतु, याबाबत चर्चा सुरु असून लवकरच नाराजी दूर होईल, असेही  भंडारी यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस