शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

जागा नाही ताब्यात, सगळे इमले हवेतच

By admin | Updated: July 4, 2017 04:28 IST

शहराची नवी ओळख निर्माण करून देणाऱ्या मेट्रो प्रकल्पापुढील अडचणींमध्ये वाढच होत चालली आहे. या प्रकल्पासाठी परदेशी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहराची नवी ओळख निर्माण करून देणाऱ्या मेट्रो प्रकल्पापुढील अडचणींमध्ये वाढच होत चालली आहे. या प्रकल्पासाठी परदेशी बँकांकडून कर्ज काढण्यात येणार असून, त्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी प्रत्यक्ष प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागा मात्र अद्याप महामेट्रोच्या ताब्यात आलेल्या नाहीत. या प्रकल्पात एकूण ७०० जुन्या झाडांवर कुऱ्हाड पडणार असून, त्या बदल्यात महामेट्रोच्या वतीने ७ हजार झाडे लावण्याचे नियोजन केले गेले आहे असे सांगण्यात आले.पुणे मेट्रोच्या मुख्य स्थानकांसाठी महामेट्रो कंपनीला शिवाजीनगर गोदाम, कोथरूड (वनाज) व कृषी महाविद्यालय येथील जागा हवी आहे, मात्र या तीनही संस्थांचा जागा देण्याला विरोध आहे. तीनपैकी एकही जागा अद्याप मेट्रोला मिळालेली नाही. तसेच अन्य ठिकाणीही काही जागांची कंपनीला आवश्यकता असून, त्यालाही गती मिळणे अवघड झाले आहे. वृक्षारोपणासाठी मात्र पाचगाव पर्वती व आकुर्डी येथे अशा दोन जागा मिळाल्या आहेत. त्याठिकाणी एकूण ७ हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.काही अपवाद वगळल्यास बहुसंख्य जागा सरकारी मालकीच्या आहेत, त्यामुळे त्या मिळण्यात अडचण येणार नाही, येत्या दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे दीक्षित म्हणाले. मात्र कृषी महाविद्यालयाचा त्यांची जागा देण्यास तीव्र विरोध आहे. शिवाजीनगर न्यायालयानेही असाच विरोध केला आहे. कोथरूड (वनाज) येथील जागेत शिवसृष्टी करावी म्हणून स्थानिक नगरसेवक दीपक मानकर व अन्य काही शिवप्रेमी संघटना प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या जागेचाही वाद आहेच. या वादांविषयी काहीही स्पष्टीकरण न देता दीक्षित यांनी येत्या दोन महिन्यांत जागेची समस्या मिटलेली असेल असे सांगितले.रेंजहिल्स ते शिवाजीनगर या मार्गाचे काम सुरू झाले आहे. वनाज ते रामवाडी या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे त्याची फेरनिविदा काढावी लागली. शिवाजीनगर ते स्वारगेट हा शहराच्या मध्यवस्तीतील भाग असून तिथून ५.१९ किलोमीटर भुयारी मार्ग काढण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पाचा एकूण खर्च ८४५ मिलियन युरो असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. त्यातील ६४५ मिलियन युरो युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक देणार आहे. उर्वरित २०० मिलियन युरोसाठी फ्रान्स व जर्मनी येथील बँका कर्ज देण्यास उत्सुक आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी जर्मन बँकेने तर नागपूरसाठी अर्थसाह्य केलेही आहे असे दीक्षित म्हणाले. एकीकडे खर्चासाठी निधी उभा करणे सुरू असताना दुसरीकडे प्रकल्पाचे प्राथमिक कामही अजून सुरू झालेले नाही याकडे दीक्षित यांचे लक्ष वेधले असता त्यांनी, काम सुरू झाले असल्याचा दावा केला.जमिनीखाली तब्बल २० मीटर अंतरावरून हा मार्ग जाईल. अत्याधुनिक यंत्रांद्वारे तो करण्यात येणार आहे. त्याचा जमिनीवरील एकाही वास्तूला धक्का लागणार नाही. १०५ तज्ज्ञ केवळ या एका मार्गासाठी काम करीत आहेत. जगभरातील अनेक तज्ज्ञांचा त्यासाठी सल्ला घेण्यात येत आहे अशी माहिती दीक्षित यांनी दिली.कामामुळे वाहतुकीत अडचणीपुणेकरांना सन २०२१मध्ये मेट्रोत बसता येईल असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला. काम सुरू होताना पुण्यामध्ये वाहतुकीचे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. मात्र त्यासाठी वाहतूक शाखा, ठेकेदार, स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने पर्यायी मार्गांचा स्वतंत्र वाहतूक आराखडा तयार केला जाईल असे ते म्हणाले. अजून हा वाहतूक आराखडा तयार झालेला नाही, प्रत्येक ठिकाणी तो वेगळा असेल, अशी माहिती त्यांनी दिली.मेट्रोच्या प्रतिकृतीस नकार1महामेट्रोने छत्रपती संभाजी उद्यानात मेट्रोची प्रतिकृती करण्याची परवानगी मागितली होती. यात हुबेहूब मेट्रोचा एक डबा उभा करण्यात येतो. त्यात मेट्रोसंबंधी सर्व माहिती मिळते. नागपूर येथे अशी प्रतिकृती करण्यात आली व त्याला नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 2महापालिकेच्या उद्यान विभागाने मात्र संभाजी उद्यानात कसलेही बांधकाम करण्यास एनजीटीची मनाई आहे असे स्पष्ट करून अशी प्रतिकृती करण्यात नकार दिला. त्याबाबत बोलताना दीक्षित यांनी, आम्ही यासाठी दुसरीकडे जागा पाहत आहोत, असे सांगितले.