शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

ठाणे शिवनेरीला वेळेचे वावडे ; प्रवाशांना मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 11:30 PM

ठाण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने या मार्गावर आरामदायी शिवनेरी बस दर अर्ध्या तासाला..

ठळक मुद्देस्वारगेट बसस्थानकातून दादरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अश्वमेध व शिवनेरी गाड्या

पुणे : स्वारगेट बसस्थानकातून दर अर्ध्या तासाला शिवनेरी सोडण्यात येत असल्याचा एसटी महामंडळाकडून केला जात असलेला दावा फोल ठरत आहे. ठाण्याला सुटणाऱ्या शिवनेरी गाड्यांना विलंब होत असल्याची स्थिती आहे. शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी तर अर्ध्या तासाहून अधिक वेळ रांगेत उभे राहिल्यानंतर बस किमान एक तास उशिराने येईल, असे प्रवाशांना सांगण्यात आले. त्याचवेळी दादरसाठी मात्र दोन अश्वमेध बस उभ्या होत्या. स्वारगेट बसस्थानकातून दादरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अश्वमेध व शिवनेरी या गाड्या सोडल्या जातात. तर ठाणे प्रवासासाठी शिवनेरीसह काही शिवशाही व हिरकणी (निमआराम) या बस असतात. ठाण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने या मार्गावर आरामदायी शिवनेरी बस दर अर्ध्या तासाला सोडण्यात येते. तसेच हिरकणी बसही दर १५ ते ४५ मिनिटांनी सोडण्यात येत असल्याचा दावा एसटी प्रशासनाकडून केला जातो. त्यानुसार ऑनलाईन बुकिंग सेवाही उपलब्ध आहे. मात्र, प्रत्यक्ष हे वेळापत्रक केवळ कागदावरच राहत असल्याचे दिसून येते. अनेकदा या गाड्या वेळेत सुटत नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे. याची पडताळणी करण्यासाठी शुक्रवारी स्वारगेट बसस्थानकात पाहणी करण्यात आली. ठाणे शिवनेरीची बुकिंग खिडकी स्वतंत्र आहे. या खिडकी समोरच्या फलाटावर बस उभ्या राहतात. दुपारी ४ वाजता एक शिवनेरी बस ठाण्याकडे रवाना झाली. त्यामुळे दुसरी बस ४.३० वाजता सुटणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात ही बस ४.२० वाजता फलाटावर लागली. ही बस लागल्यापुर्वी प्रवाशांनी बुकींगसाठी रांग लावली होती. बस आल्यानंतर १५ मिनिटांनी बुकींग सुरू झाले. ही बस ५ वाजून ५ मिनिटांनी म्हणजे अर्धा तास विलंबाने निघाली. यावेळी तिकीट खिडकीवर २५ ते ३० प्रवाशांची रांग होती. पुढची बस साडे पाच वाजेपर्यंत आली नाही. त्यावेळी बुकींग करणाºया महिला कर्मचाऱ्याने बस एक तास विलंबाने येणार असल्याचे प्रवाशांना सांगितले. त्यासाठी ही बस ठाण्यातून २.३० वाजता निघाल्याचे कारण देण्यात आले. तर वाहतुक कोंडीमुळे बस विलंबाने येणार असल्याची उदघोषणा करण्यात आली. यावेळी ठाण्याकडे जाणारी हिरकणी किंवा शिवशाही बसही नव्हती. त्यामुळे अर्धा तासाहून अधिक वेळ रांगेत उभे राहिलेल्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर काही प्रवासी दादरला निघाले, तर काही प्रवासी बसची वाट पाहत तिथेच थांबले.--------------

वेळापत्रकाला खो ; प्रवासी त्रस्त   

शुक्रवारी ठाण्याला जाणाऱ्या विलंबाने धावत असल्या तरी दादरच्या बस मात्र वेळेत होत्या. शिवनेरी तासभर उशिरा असताना त्यावेळी दादरसाठी दोन अश्वमेध बस उभ्या होत्या. दीड तासात चार अश्वमेध बस दादरकडे रवाना झाल्या. एकीकडे ठाण्याहून येणाऱ्या बस वाहतुक कोंडीमुळे विलंबाने धावत असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे मात्र दादरहून येणाऱ्या बसेस वेळेत होत्या. दोन्ही बस द्रुतगर्ती मार्गानेच जातात.ठाण्यासाठी जुन्या शिवनेरीएसटीच्या पुणे विभागाकडून काही शिवनेरी बसचे आयुर्मान आठ वर्षांहून अधिक झाले आहे. या बसला मुंबईत जाण्यासाठी बंधने आहेत. त्यामुळे सर्व जुन्या बस ठाण्याला सोडण्यात येत आहेत. तर आठ वर्षांहून कमी आयुर्मान असलेल्या बस दादरला सोडल्या जातात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेTravel Tipsट्रॅव्हल टिप्सSwargateस्वारगेट