no passenger in On arrival flights at Pune airport, but many crowd to outgoingon the way | पुणे विमानतळावर येताना प्रवाशांची खडखडाट, जाताना भरगच्च

पुणे विमानतळावर येताना प्रवाशांची खडखडाट, जाताना भरगच्च

ठळक मुद्देसध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुणे शहर केंद्र सरकारच्या रडारवर येणारी व जाणारी विमाने जवळपास तेवढीच असली तरी येणाऱ्यांची संख्या निम्म्याने कमी

पुणे : विमानसेवा सुरू झाल्यानंतर पुण्यातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर पुण्यात येणारी विमाने मात्र पुरेशा प्रवाशांअभावी रिकामी धावत असल्याचे चित्र आहे. ये-जा करणाऱ्या विमानांची संख्या सारखी असली तर प्रवाशांच्या आकड्यामध्ये जवळपास निम्मा फरक दिसत आहे.
लॉकडाऊनमुळे दोन महिने बंद असलेली देशांतर्गत विमानसेवा २५ मेपासून सुरू झाली. पुणे विमानतळावरून दिल्ली, बेंगलुरू, अहमदाबाद, कोची, चेन्नई, कोलकाता, हैद्राबाद आदी शहरांसाठी विमानांचे उड्डाण होत आहे. पण सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुणे शहर केंद्र सरकारच्या रडारवर आहे. रेड झोनमध्ये असल्याने पुण्यातील अनेक भागात निर्बंध आहेत. परिणामी, पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन केले जात आहे. रेल्वेने पुण्यातून लाखो प्रवासी मुळगावी परतले आहेत. आता विमानसेवा सुरू झाल्यानंतरही पुणे सोडण्याला अधिक पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.
 

विमानफेऱ्या वाढल्या
पुणे विमानतळावरून २५ मेला एकुण  १७ विमानांनी ये-जा केले होते. त्यानंतर हा आकडा वाढत गेला. येणारी व जाणारी विमाने जवळपास तेवढीच असली तरी पुण्यात येणाऱ्यांची संख्या जवळपास निम्म्याने कमी आहे. जाणाऱ्यांची संख्या दुप्पट असल्याचे दिसते. शुक्रवारी (दि. २९ मे) सायंकाळी सात वाजेपर्यंत पुण्यात आलेल्या १३ विमानांमधून ५२५ प्रवासी उतरले. तर १२ विमानांचे विमानतळावरून उड्डाण झाले. त्यातून १३९० प्रवासी पुणे सोडून गेले. पुणे सोडून जाणाऱ्या प्रवाशांची मागणी जास्त असली तरी मर्यादीत विमानांचेच उड्डाण करण्याची परवानगी आहे. त्यामुळे सध्या दररोज सरासरी १५ विमानांचे उड्डाण होत आहे. त्यातून जवळपास १५०० प्रवासी जात आहेत.
------------
मागील पाच दिवसांतील स्थिती
                             २५ मे     २६ मे    २७ मे    २८ मे     २९ मे
 
विमाने आली           ९            १४       १७       १२          १३
प्रवासी                  ६७२          ७१९      ८३५    ५५२       ५२५
विमाने गेली            ८            १४        १६       १२         १२
प्रवासी                 ९८५           १४३४   १६६६   १३१३    १३९०

--------------------

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: no passenger in On arrival flights at Pune airport, but many crowd to outgoingon the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.