शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

निम्म्या भागाला नाही प्रतिनिधित्व

By admin | Updated: February 25, 2017 02:40 IST

प्रभाग पद्धतीत पूर्वीच्या दोन ते तीन प्रभागांची मोडतोड करून बनविलेल्या या नव्या ४च्या प्रभाग पद्धतीत उमेदवारी देताना पक्षांनी सर्व भागाला प्रतिनिधीत्व मिळेल

पुणे : प्रभाग पद्धतीत पूर्वीच्या दोन ते तीन प्रभागांची मोडतोड करून बनविलेल्या या नव्या ४च्या प्रभाग पद्धतीत उमेदवारी देताना पक्षांनी सर्व भागाला प्रतिनिधीत्व मिळेल, अशा उमेदवारांची निवड करण्याऐवजी निवडून येण्याची शक्यता या निकषावर उमेदवारी दिल्याने गुरुवारी झालेल्या मतमोजणीत काही भागांना आता महापालिकेत प्रतिनिधीत्वच मिळाले नसल्याचे दिसून येत आहे़ प्रभाग क्रमांक ७ आणि १४ या दोन प्रभागांचा विचार केल्यास फर्ग्युसन रोडच्या पश्चिमेकडील भागाला ८ नगरसेवकांमध्ये प्रतिनिधीत्व मिळाले नसल्याचे दिसत आहे़ अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत़ ड्रेनेज तुंबले आहे, पाणी येत नाही, रेशनकार्डवर धान्य मिळत नाही़ शाळेत अ‍ॅडमिशन मिळवून द्या, भटक्या कुत्र्यांचा त्रास अशा अनेक तक्रारी नगरसेवकांकडे केल्या जातात़ याशिवाय अंतर्गत रस्त्यावरील पार्किंग, गटागटांमधील, शेजाऱ्यांमधील भांडण्यापर्यंतच्या तक्रारी जवळ असलेला हक्काचा माणूस म्हणून लोक नगरसेवकांकडे जात होते़ पण, चारच्या प्रभागामुळे प्रभाग खूप मोठा झाल्याने त्यांना या नगरसेवकांना भेटण्यासाठी दूरवर जावे लागणार आहे़ प्रभाग क्रमांक ७मध्ये गोखलेनगर, जनवाडी, चतु:शृंगी परिसर, कस्तुरबा वसाहत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कामगार पुतळा, पाटील इस्टेट, भोसलेनगर, अशोकनगर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, वाकडेवाडी, संगमवाडीचा भाग, मुळा रोड हा परिसर येतो़ या प्रभागातून निवडून आलेले भाजपाचे चारही उमेदवार हे एकाच भागात राहतात़ भाजपापुरस्कृत रेश्मा भोसले या भोसलेनगरमध्ये राहतात़ त्यांचे कार्यालय हे वाकडेवाडीला आहे़ राजश्री काळे या दत्तवाडी येथे प्रभागापासून खूप लांब राहणाऱ्या आहेत़ निवडणुकीत त्यांना तिकीट मिळाल्यावर त्यांनी गोखलेनगरमधील निसर्ग सोसायटीत कार्यालय केले आहे़ आदित्य माळवे हे मॉडेल कॉलनीत राहतात़ पण, त्यांचा भाग या प्रभागात येत नसून तो प्रभाग क्रमांक १४ मध्ये येतो़ सोनाली लांडगे या वाकडेवाडी येथील पीएमसी कॉलनीत राहतात़प्रभाग क्रमांक १४ मधून विजयी झालेले भाजपाचे ४ ही उमेदवार फर्ग्युसन रोडच्या पूर्व भागात राहतात़ सिद्धार्थ शिरोळे घोले रोडला, स्वाती लोखंडे या कामगार पुतळा येथे, ज्योत्स्ना एकबोटे रेव्हेन्यू कॉलनीत राहतात़ नीलिमा खाडे या पुलाचीवाडी येथे राहतात़ प्रभाग क्रमांक १४ डेक्कन जिमखाना, मॉडेल कॉलनीमध्ये गोखलेनगरचा काही भाग, वडारवाडी, बीएमसीसी कॉलेज, लॉ कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन जिमखाना, संभाजी उद्यान, मनपा भवन, घोले रोड, इंजिनिअरिंग कॉलेज, पीवायसी, शिवाजीनगर पोलीस लाईन, मॉडेल कॉलनी, पुलाचीवाडी हा भाग येतो़ हे पाहता गोखलेनगर, वडारवाडी, लॉ कॉलेज, बीएमसीसी कॉलेज, चतु:शृंगी परिसर, कस्तुरबा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या संपूर्ण परिसरातील एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही़ भाजपाने तिकीटवाटप केले, त्या वेळीच पक्षातील नाराजांनी हा मुद्दा उपस्थित केला होता़ हा सर्व परिसर आता नगरसेवकांविना पोरका झाला आहे़ (प्रतिनिधी)