शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

नारायणगावला ‘नो पार्किंग झोन’चा आमदारांनाही झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 19:24 IST

नारायणगाव येथील बसस्थानका समोरील मुख्य चौकात हॉटेल ऋषी समोर आमदार -विधानसभा सदस्य असा स्टिकर असलेली गाडी महामार्गावर नो पार्किंग झोनमध्ये रस्त्यावरच मध्यभागी उभी असल्याने पोलिसांनी त्याला जॅमर लावला़..पण...

ठळक मुद्देआमदार चाबुकस्वार यांची सुमारे १० मिनिट अरेरावी करीत पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत२०० रुपयांची दंडात्मक कारवाई

नारायणगाव : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून नो - पार्किंग मध्ये वाहन लावणाऱ्या अनेक पुढाऱ्यांना नारायणगाव पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे़. नो पार्किंगमध्ये वाहन लावणारे आमदार गौतम चाबुकस्वार यांना देखील रविवारी याचा प्रत्यय आला. मात्र, आमदार चाबुकस्वार यांच्या वाहनाला जॅमर लावल्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची त्यांनी हुज्जत घालून अरेरावी केल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली़नारायणगाव येथील बसस्थानका समोरील मुख्य चौकात हॉटेल ऋषी समोर पोलिसांनी नो पार्किंग झोन केला आहे़ त्याठिकाणी रविवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची कार उभी केली होती. या कारवर आमदार -विधानसभा सदस्य असा स्टिकर असलेली गाडी महामार्गावर नो पार्किंग झोनमध्ये रस्त्यावरच मध्यभागी उभी असल्याने पोलिसांनी त्याला जॅमर लावला़ कार चालक साडेचार वाजता गाडी जवळ आला. त्याने जामर पहिल्यावर पोलिसांची आमदारांची गाडी आहे म्हणत हुज्जत घातली. तसेच दमही दिला. पण पोलिसांनी आपली गाडी नो पार्किंग मध्ये उभी असल्याने वाहतूक नियमाचे उल्लंघन झाले आहे, तुम्हाला पावती फाडावीच लागेल असे सांगितले. यादरम्यान आमदार गौतम चाबुकस्वार कारच्या पुढील सीट वर येऊन बसले़. त्यांना चालकाने गाडीला पोलिसांनी जामर लावल्याचे सांगितले.  हे ऐकताच आमदार साहेबांचा राग अनावर झाला़. त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल लोहार यांना ‘चल रे जॅमर काढ, नाहीतर तुझी वर्दी उतरवेल, मी आमदार आहे. तुझ्या एसपीला फोन लावू का, जॅमर काढ’ अशी अरेरावी करीत पोलीस कर्मचाऱ्याशी सुमारे १० मिनिट हुज्जत घातली. शेवटी वादविवाद चालू असताना स्थानिक पत्रकार तिथे आले व त्यांनी आमदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या सचिवांनीही पत्रकारांशी ही अरेरावी केली़. शेवटी उपस्थित पत्रकारांनी कायदा सर्वांना समान असून जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी, नारायणगावचे सरपंच आणि पंचायत समिती सभापती यांनीही कायद्याचा आदर करीत स्वत: २०० रुपयांची पावती फाडली आहे. आपणही लोकप्रतिनिधी आहात. आपण  कायद्याचा आदर करावा, असे सांगितल्यावर आमदार चाबुकस्वार यांचा राग शांत झाला. त्यांचे चालक पंकज सुरेश बोरकर , पुणे यांनी मोटर वाहन कलम ११९/१७७ नुसार २०० रुपये दंडाची पावती फाडली़ आणि आमदार पुण्याच्या दिशेने रवाना झाले.   

टॅग्स :narayangaonनारायणगावCrime Newsगुन्हेगारीMLAआमदारtraffic policeवाहतूक पोलीस