शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

ना टाळ-मृदंगाचा गजर, ना कीर्तनाचा सूर; पालखी विसावणाऱ्या नाना आणि भवानी पेठेत यंदा कोरोनामुळे 'विसावा' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 11:31 IST

दरवर्षी पुण्यात मुक्कामी राहणाऱ्या पालखी सोहळ्यात यंदा कोरोनामुळे खंड पडल्याची हुरहूर सर्वांच्याच मनाला लागून राहिली... 

ठळक मुद्देसंपूर्ण परिसरात नीरव शांततेचे चित्र

नम्रता फडणीस- पुणे: ना टाळ-मृदुंगाचा गजर...ना मंदिरामध्ये कीर्तनाचा सूर ...ना गर्दीने फुललेला परिसर... ना वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यकर्ते आणि भाविकांची लगबग...हे चित्र आहे, नाना आणि भवानी पेठेतील. दरवर्षी पुण्यनगरीत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या मुक्कामी असलेल्या पालख्यांमुळे पूर्णत: गजबजलेल्या या परिसरात कोरोनामुळे एक नीरव शांतता अनुभवायला मिळत आहे. यंदा पालख्यांचे दर्शन घेता न आल्याने कार्यकर्त्यांसह भाविक हवालदिल झाले आहेत.    

पांडुरंगाच्या भेटीसाठी अलंकापुरीकडे निघालेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे दरवर्षी पुण्यनगरीत जल्लोषात आगमन होते. प्रथेप्रमाणे पुणे मुंबई रस्त्यावरील कमल बजाज उद्यान येथे पालख्यांचे स्वागत केल्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालय, फर्ग्युसन रस्ता, डेक्कन, लक्ष्मी रस्ता मार्गे यापालख्यांचा पावनस्पर्श पुण्यभूमीला होतो. अवघी पुण्यनगरी भक्तिरसात न्हाऊन निघते. श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात विसावते. दोन दिवस पालख्यांचा पुण्यनगरीत मुक्काम असतो.

यंदाच्या वर्षी १२ जूनला श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहूतून तर १३ जूनला श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान झाले. त्यानुसार १४ आणि १५ जूनला या दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यात असला असता. मात्र यंदा दोन एकादशी आल्यामुळे १६ जूनसह तीन दिवस पालखी पुणे मुक्कामी राहिली असती आणि शुद्ध एकादशीला आज (१७ जून) या पालख्यांचे पुण्यातून प्रस्थान झाले असते..मात्र आज नाना आणि भवानी पेठेतील चित्र काहीसे वेगळेच पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटामुळे हे दोन्ही भाग कंटेन्मेंट झोन मध्ये येत असल्याने या परिसरात पूर्णत: संचारबंदी लागू आहे..रस्ते बॅरिकेट्स टाकून बंद करण्यात आले आहेत. दुकानांची शटर पूर्णत: बंद आहेत...रस्त्यावर शुकशुकाट असल्याचे चित्र आहे..दरवर्षी पंढरपूरच्या वारी सोहळ्यादरम्यान या परिसरात वैष्णवांचा मेळा भरल्याचे पाहायला मिळते..

श्री निवडुंग्या विठोबा मंदिर आणि पालखी विठोबा मंदिरात पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडालेली असते...वारकऱ्यांना अन्न, पाणी, न्हावी, चप्पल सेवेसह मेडिकल सेवेसाठी स्वयंसेवी संस्था, गणेश मंदिरांचे कार्यकर्ते यांची लगबग सुरू असते..या परिसरात व्यापारी वर्ग मोठा असल्याने पालखी काळात अनेकांचा चांगला व्यवसाय होतो..पुढचे सहा महिने त्यांचे उत्तम जातात..यंदा मात्र या परिसरात नीरव शांततेची अनुभूती पाहायला मिळत आहे.दरवर्षी पुण्यात मुक्कामी असलेल्या पालखी सोहळ्यात यंदा कोरोनामुळे खंड पडल्याची हुरहूर कार्यकर्त्यांसह सर्वांच्याच मनाला लागून राहिली. 

..... आम्ही दरवर्षी वारकऱ्यांच्या सेवेतच ' पांडुरंग' अनुभवतो. वारकऱ्यांसाठी भजन कीर्तनाबरोबरच शेतीविषयी माहिती देणारे काही उपक्रम राबवितो. संपूर्ण परिसर भक्तीमय होऊन जातो. यंदा कोरोनामुळे पालख्यांचे दर्शन घेता आले नसल्याची मनाला हुरहूर वाटत आहे.

- भाई कात्रे, कार्याध्यक्ष, साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिर....... पुण्यात पालखीचे आगमन झाल्यानंतर आमची श्री निवडुंगा विठोबा मंदिर भजनी मंडळाची दिंडी पालखीमध्ये सहभागी होते..आणि मग संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी श्री निवडुंगा विठोबा मंदिरात आणली जाते..भाविकांची दर्शनासाठी झुंबड उडते..यंदा हे वातावरण अनुभवायला मिळणार नसल्याने जगणंच विचित्र वाटायला लागले आहे..काही सुचतच नाही..दरवर्षी या काळात गर्दी बघायची सवय झालेली आहे. संपूर्ण वाडा वारकऱ्यांच्या गर्दीने फुललेला असतो..ते सगळं वातावरण डोळ्यासमोर उभे राहून मन गलबलून येत आहे.

- नंदकुमार भांडवलकर, श्री निवडुंगा विठोबा मंदिर भजनी मंडळ.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीPandharpur Wariपंढरपूर वारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस