शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये, अजित पवारांचं 'विजयस्तंभाला' अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 09:30 IST

कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी 1 जानेवारी 1818 रोजी इंग्रज,

कोरेगाव भीमा (जि. पुणे) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. शूरवीरांची आठवण ठेवण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी सर्वांनी इथं यावं. तसेच, कुणी काहीही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कुणीही विश्वास ठेऊ नये, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. 

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही भीमा-कोरेगाव येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. तसेच, पोलिसांनी दक्षता घेतली आहे, काही जणांवर ते नजर ठेऊनही आहेत. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नसल्याचं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय.  भीमाकाठावरील कोरेगाव भीमानजीक ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी विविध पक्ष, संघटना आणि मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून 1 जानेवारीला पुण्यात भीमसागर लोटला आहे. विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी सुमारे 10 हजार पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी 1 जानेवारी 1818 रोजी इंग्रज, महार रेजिमेंट व पेशवे यांच्या सैन्यात लढाई झाली. यात महार बटालियनच्या 500 सैनिकांनी पेशव्यांच्या 28 हजार सैनिकांचा पाडाव करुन विजय मिळविला होता. त्यात महार रेजिमेंटच्या अनेक सैनिकांना वीरमरण आले. या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी 1822 मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. 1927 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकरी बांधव 1 जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) रामदास आठवले, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे आनंदराज आंबेडकर, भारतीय दलित कोब्राचे अ‍ॅड. भाई विवेक चव्हाण, रिपब्लिकन जनशक्तीचे अर्जुन डांगळे, समता सैनिक दल राष्ट्रीय अध्यक्षा मीरा आंबेडकर, भीमराव आंबेडकर, भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम, रिपब्लिकन युवा मोर्चा, भारतीय बौद्ध महासभा, महाराष्ट्र क्रांतिसेना, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे, क्रांती मजदूर पुणे शहर, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवासंघ, भीमशक्ती युवा सेना यांच्या येथे आज सभा होणार आहेत. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPuneपुणे