पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. शंभर टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांची संख्या १,९२९ असून, यंदाच्या निकालात शंभर टक्के गुण कोणत्याच विद्यार्थ्याला मिळवता आलेले नाहीत. यंदा २० हजार ९४३ विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किंवा स्काउट गाइडचे गुणे मिळाले आहेत. तृतीयपंथी १८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, अशी माहिती परीक्षा मंडळाने दिली आहे.
विद्यार्थ्यांना जेईई, नीट यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याकरिता पुरेसा वेळ मिळावा, या दृष्टीने यंदा बारावीची परीक्षा दहा दिवस लवकर घेण्यात आली हाेती, तसेच कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यात विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. सरासरी निकाल कमी लागला असला, तरी मागील वर्षाच्या तुलनेत फार तफावत नाही. - शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ.
यंदाच्या गुणवत्तेचा तक्ता
९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी - ८३५२८५ ते ९० टक्के - २२,३१७८० ते ८५ टक्के -४६,३३६७५ ते ८० टक्के - ७४,१७२७० ते ७५ टक्के - १,०३,०७०६५ ते ७० टक्के - १,३१,८१२६० ते ६५ टक्के - १.८१,७५५४५ ते ६० टक्के - ६,००,२२७
टक्केवारीची स्थिती
१.४९ टक्के निकाल घसरला
निकालातील विशेष काय?
- एकूण विद्यार्थी - १४ लाख २७ हजार ०८५- परीक्षा दिलेले - १४ लाख १७ हजार ९६९- उत्तीर्ण झालेले - १३ लाख २ हजार ८७३- नाेंदणी केलेले पुनर्परीक्षार्थी - ४२ हजार ३८८- परीक्षा दिलेले - ४२ हजार २४- उत्तीर्णतेची टक्केवारी - ३७.६५- नोंदणी केलेले दिव्यांग - ७ हजार ३१०- परीक्षा दिलेले - ७ हजार २५८- उत्तीर्ण - ६ हजार ७०५ (९२.३८ टक्के)- नोंदणी केलेले खासगी विद्यार्थी - ३६ हजार १३३- परीक्षा दिलेले -३५ हजार ६९७- उत्तीर्ण - २९ हजार ८९२ (८३.७३ टक्के)- एनसीसी, क्रीडा, स्काउट गाइडसाठी सवलतीचे गुण मिळालेले विद्यार्थी - २० हजार ९४३- निकाल राखून ठेवलेले विद्यार्थी - १३७- प्रतिबंधित केलेले विद्यार्थी - १३०