स्वाइन फ्लूचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही.

By Admin | Updated: March 24, 2015 00:34 IST2015-03-24T00:34:35+5:302015-03-24T00:34:35+5:30

रुग्णाच्या साथीचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. तरी शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत सात रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २१ रुग्ण उपचार घेत आहेत.

No new patients found swine flu | स्वाइन फ्लूचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही.

स्वाइन फ्लूचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही.

पिंपरी : स्वाइन फ्लूचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. त्यामुळे रुग्णाच्या साथीचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. तरी शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत सात रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २१ रुग्ण उपचार घेत आहेत.
मागील काही दिवसांपासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या घटली आहे, तर बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येतही घट दिसून येत आहे. तापमान वाढू लागताच स्वाइन फ्लूचे प्रमाण कमी होईल, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत होते. काही दिवसांपूर्वी हवामानात अचानक बदल झाल्यामुळे थंडीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली होती.
स्वाइन फ्लूचा संसर्ग रुग्णांच्या थुंकी आणि खोकल्यातून मोठ्या प्रमाणात होते. थंड हवामानात विषाणू सात-आठ तास जिवंत राहू शकतो. तापमान जास्त असल्यास तो जास्त काळ टिकू शकत नाही. त्यामुळे आपोआपच आजाराचा प्रसार कमी होतो. टॅमिफ्लूच्या गोळ्या आणि इतर औषधेही अनेक ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे त्याचाही मोठा फायदा रुग्णांना मिळत आहे.
लाटे परिसरात एकाचा मृत्यू
बारामती : लाटे परीसरातील बजरंगवाडी येथील युवकाचा रविवारी (दि२२) सायंकाळी स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. या युवकासह बारामती शहर, तालुक्यातील एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ महेश जगताप म्हणाले, ‘‘तानाजी रामचंद्र खलाटे (वय २८) असे या युवकाचे नाव आहे. सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवल्याने १६ मार्च रोजी त्याने दवाखान्यात उपचार घेतले.तानाजी यास उपचारासाठी फलटण येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.’’(प्रतिनिधी)

Web Title: No new patients found swine flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.