कलाकृती सशक्त असेल तर पार्श्वसंगीताची गरज नाही : राहुल रानडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 09:11 PM2019-11-11T21:11:11+5:302019-11-11T21:11:44+5:30

नेपथ्य, संगीत याशिवायही नाटक होऊ शकते.

No need for background music if artwork is strong: Rahul Ranade | कलाकृती सशक्त असेल तर पार्श्वसंगीताची गरज नाही : राहुल रानडे

कलाकृती सशक्त असेल तर पार्श्वसंगीताची गरज नाही : राहुल रानडे

googlenewsNext

पुणे : संगीत देण्यासाठी नाटक हे आवडीचे माध्यम आहे. नाटकाला पार्श्वसंगीताची गरज असते का? तर नसते. आपल्याला पार्श्वसंगीताची सवय झाली आहे. नेपथ्य, संगीत याशिवायही नाटक होऊ शकते. पण तांत्रिक बाजूंचा उपयोग नाटय अधिक प्रभावी होण्यासाठी केला जाऊ शकतो. तो परिणाम मात्र अचूक साधता आला पाहिजे. मुळात कलाकृती जर सशक्त असेल तर पार्श्वसंगीताची आवश्यकता नाही असे प्रतिपादन संगीतकार राहुल रानडे यांनी केले. समरस होऊन केलेले काम हे यशाचे गमक असल्याचेही ते म्हणाले. 
शतकोत्तर रौप्यमहोत्सवर्षाची अखंड परंपरा असलेल्या भरत नाटय संशोधन मंदिर आणि संवाद पुणेतर्फे नाट्य-तंत्रज्ञ संमेलनात ‘संगीत’ या विषयावर त्यांच्याशी ज्येष्ठ समीक्षक राज काझी यांनी संवाद साधला. नाटक, सिनेमाला दिले जाणारे पार्श्वसंगीत याविषयी विवेचन करतानाच ‘भरत’च्या रंगमंचावरील प्रयोग ते व्यावसायिक नाटक-चित्रपटाला दिलेले संगीत येथपर्यंतचा प्रवास सांगून संगीताचे काही प्रकार त्यांनी रसिकांना ऐकवले. ग्रीप्स रंगभूमीवरील अनुभवही त्यांनी सांगितले.
नाटकाला दिलेले संगीत हे अस्तर लावल्यासारखे असते. संगीत हे नाटकातील पात्रच आहे, असे समजून नाटकाला संगीत देण्याचा प्रयत्न करतो, पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत तांत्रिक बाजूंना पारितोषिक दिले जात नाही. दिले जावे की न दिले जावे याचा दोन्ही बाजूने विचार व्हायला हवा. ज्या स्पर्धांमध्ये तांत्रिक बाजूंसाठी पारितोषिक असते त्या स्पर्धांमध्ये तंत्रज्ञ लक्ष देऊन काम करतात का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
दृश्य दिसले की सूर उमटतात. नाटकाची तालीम बघून पार्श्वसंगीत किती आवश्यक आहे याचा विचार करुन मी संगीत देतो. आवश्यकता नसेल तर दिग्दर्शकाला तसेही सांगतो. नाटकात संगीत कुठे सुरू करायचे? कुठे थांबवायचे हे ठरवावे लागते. हा विचार करताना कलाकारांने जागा, संवाद विसरता कामा नये याकडेही रानडे यांनी लक्ष वेधले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसे यांनी स्वागत केले. भरत नाटय मंदिराचे कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी सूत्रसंचालन केले. संवाद पुणेचे सुनिल महाजन उपस्थित होते.
 

Web Title: No need for background music if artwork is strong: Rahul Ranade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.