शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Pune: प्रचारात १० पेक्षा अधिक वाहने नको; आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई, पोलिसांकडून आचारसंहितेची अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 19:08 IST

कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक सभा/सभेचे ठिकाण व वेळ याबाबत संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक

पुणे: शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ११ विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. येथील निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी आचारसंहिता अंमलबजावणीच्या अनुषंगाने महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.

पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत शिरूर, पुरंदर, भोर, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोनमेंट आणि कसबा या ११ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तेथील निवडणुकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून शर्मा यांनी आदेश दिले आहेत. हे आदेश २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे देखील प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.

याची चाेख अंमलबजावणी करा

१) कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक सभा/सभेचे ठिकाण व वेळ याबाबत संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.२) कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका काढण्याबाबत संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.३) ध्वनिक्षेपकाचा वापर कोणत्याही प्रकारे रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत करू नये.४) फिरत्या वाहनांवरून ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये. ध्वनिक्षेपकाचा वापर वाहन थांबवूनच करावा.५) ध्वनिक्षेपकाचा परवाना जवळ बाळगावा.६) ध्वनिक्षेपकाच्या आवाज मर्यादेची काटेकोरपणे पालन करावे.७) शाळा, कॉलेज, रुग्णालय या ठिकाणी थांबून ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये.८) निवडणुकीच्या कालावधीत प्रचाराच्या अनुषंगाने एका वेळी कोणत्याही परिस्थितीत १० पेक्षा अधिक वाहने एका ताफ्यात चालवू नयेत, तसेच दोन ताफ्यातील अंतर २०० मीटर/१५ मिनिटांचे असावे.९) ज्या मार्गाने मिरवणूक किंवा जमाव जाईल अथवा जाणार नाही, ती वेळ व मार्ग पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी निश्चित करावा.१०) सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणूक कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या लाऊड स्पीकरच्या ध्वनीची तीव्रता आणि निश्चित करून दिलेली वेळ यावर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी नियंत्रण करावे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024PoliticsराजकारणSocialसामाजिक