शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

कंपनीने कितीही दबाव आणला, तरी आम्ही संप मागे घेणार नाही : अँमेझॉन डिलिव्हरी बॉईजचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 2:10 PM

कंपनीकडून दिला जातोय दबाव बॉईज तीन दिवसांपासून संपावर

ठळक मुद्देकंपनीकडून डिलिव्हरी बॉईजला धमकी 

पुणे: डिलिव्हरी बॉयच्या प्रति पार्सलमागे दर वाढवणे, प्रत्येकाला इन्शुरन्स क्लेम मिळावा, प्रत्येकाला केवायसी अनिवार्य करू नये, अशा विविध मागण्यांसाठी अँमेझॉन डिलिव्हरी बॉईजने पुणे शहरात संप पुकारला आहे. त्यामुळे शहरातील अँमेझॉन कार्यालयात अनेक वस्तूंचा साठा पडून आहे. कंपनीने कितीही दबाव आणला तरी आम्ही संप मागे घेणार नाही. असा इशारा डिलिव्हरी बॉयने कंपनीला दिला आहे.

अँमेझॉन ही जगातील ऑनलाइन डिलिव्हरीसाठी प्रसिद्ध कंपनी मानली जाते. देशातही असंख्य नागरिक अँमेझॉनवरून वस्तू घेण्याला प्राधान्य देतात. कोरोना काळात तर यांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली होती. अजूनही वाढ होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने काही डिलिव्हरी बॉइसची मते जाणून घेतली. 

शहरात अँमेझॉन या कंपनीसाठी काम करणारे १ हजार ते दीड हजार डिलिव्हरी बॉय आहेत. प्रत्येक जण ८ ते १० तास काम करतो. तर ८० ते १०० च्या आसपास डिलिव्हरी करतो. त्यांना सकाळी ७ वाजल्यापासून कामाला सुरुवात करावी लागते. वेळेत डिलिव्हरी पूर्ण झाली नाही. तर अजून काही वेळ वाढवून काम करावे लागते.  त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.  कारण लोकांच्या दारावर जाऊन डिलिव्हरी द्यावी लागत असे. नाहीतर नागरिक कंपनीकडे तक्रार करत होते. तसेच पत्ते सापडण्यासही खूप अडचणी येतात. मग डिलिव्हरी वेळेवर होत नाही. तरीही आम्ही कामे पूर्ण केल्याशिवाय घरी जात नाही. असेही त्यांनी सांगितले. तरीही कोणत्याही डिलिव्हरी बॉयने काम सोडण्याचा प्रयत्न केला नाही. अनेक जण १०० टक्के चांगले काम करत होते. नवीन डिलिव्हरी बॉयला महिना १० हजार रुपये वेतन मिळत आहे. त्यामध्येही कंपनी अटी लागू करून आमच्यावर  दबाव आणत आहे. कंपनीने मध्यंतरी प्रति पार्सल मागे दर कमी केले होते. ते वाढवण्याची आम्ही मागणी करत आहोत. 

कंपनीकडून डिलिव्हरी बॉईजला धमकी कंपनीच्या कार्यालयात वस्तूंचा साठा वाढत चालला आहे. शहरात लाखांच्या घरात वस्तू कार्यालयात पडून आहेत. " तुम्ही कामावर आले नाहीत, तर कामावरून काढण्यात येईल " अशी धमकी कंपनीच्या मॅनेजर आणि सुपरवायजर कडून दिली जात आहे. 

 मागण्या - व्हॅन ३५ रुपये प्रति पार्सल करावे- छोटे पार्सल २० रुपये प्रति पार्सल करावे - आय एच एस २५ रुपये प्रति पार्सल करावे - एक दुचाकी व्यक्तीला २० रुपये प्रत्येकी द्यावेत - व्हॅन साठी ७०,८० रुपये द्यावेत - २० ते २५ पाकीटला ४८० रुपये द्यावेत. - प्रत्येकाला केवायसी आग्रह नको - प्रत्येकाला इन्शुरन्स क्लेम पाहिजे. 

टॅग्स :Puneपुणेbikeबाईक