शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

" शरद पवारांनी कितीही प्रमाणपत्रं दिली अन् मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर कितीही हल्ले करायला लावले तरी..."; किरीट सोमय्यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 17:16 IST

शरद पवार तुम्ही गवळींना वाचवत आहात. त्यांना वाचवायचं असेल तर पवारांनी तसं स्पष्ट सांगावं...

पुणे : ईडीकडून राज्यात सुरु असलेल्या कारवायांमुळे महाविकास आघाडी सरकार व भाजपच्या नेत्यांमध्ये सातत्याने एकमेकांवर निशाणा साधण्यात येत असतो. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुद्धा पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना राज्यात यापूर्वी ईडीच्या एवढ्या कारवाया बघायला मिळाल्या होत्या का? असा सवाल करत केंद्र सरकारवर टीका केली होती. मात्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याच मुद्द्यांवरून शरद पवारांवर टीकास्र सोडले आहे. 

भाजप नेते किरीट सोमय्या हे गुरुवारी पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री बाळा भेगडे आदी उपस्थित होते. सोमय्या म्हणाले, एखादी खासदार व्यक्ती ११८ कोटी एवढी मोठी रक्कम बँकेतून काढते कसे? शरद पवार तुम्ही गवळींना वाचवत आहात. गवळी यांना वाचवायचं असेल तर पवारांनी तसं स्पष्ट सांगावं. मात्र, शरद पवारांनी कितीही प्रमाणपत्रं दिली अन् मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर कितीही हल्ले करायला लावले तरी मी महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणारच आहे अशा शब्दात सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. 

गणेश विसर्जनानंतर बारामतीतून विसर्जनाची प्रक्रिया होणार ... राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे डाकूंचं सरकार आहे असल्याची टीका करतानाच सोमय्या म्हणाले, मी पुण्यात तक्रार नोंदवली आहे. मला याविषयी योग्य प्रतिक्रिया मिळाली की, मी 'तिसऱ्या अनिल'चं नाव घोषित करणार आहे. गणपती तर नीट जाऊ द्या. गणेश विसर्जनानंतर विसर्जनाची प्रक्रिया बारामती येथून होणार असल्याचे म्हणत एकप्रकारे शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना इशारा दिला आहे. 

आगे आगे देखो होता है क्या... 

छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून दोषमुक्त केल्याबद्दल विचारलं असता किरीट सोमय्यांनी आगे आगे देखो होता है क्या, असं शायरीतूनचं उत्तर दिलं. कितीही अटॅक करा, मी महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, असंही सोमय्या म्हणाले.

भाजपचा आरोप आणि भावना गवळींच्या संस्थांवर ईडीची कारवाई यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर १०० कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपने केला होता. या तक्रारीनंतर यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थांवर ३० ऑगस्टला ईडीने कारवाई केली होती. ईडीने वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथे या धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे. रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीने धाडी टाकल्या होत्या.

छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून दोषमुक्त केल्याबद्दल विचारलं असता किरीट सोमय्यांनी आगे आगे देखो होता है क्या, असं शायरीतूनचं उत्तर दिलं. कितीही अटॅक करा, मी महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, असंही सोमय्या म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेBhavna Gavliभावना गवळीKirit Somaiyaकिरीट सोमय्याShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवार