शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

हार नको, गुच्छ नको.... आपल्या ‘छत्रपती’ला गाळपासाठी ऊस द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:17 IST

- श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची सभासदांना भावनिक साद

बारामती : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सत्काराला हार-गुच्छ देऊ नका, पण कारखान्याला गाळपासाठी ऊस द्या, अशी भावनिक साद सभासदांना घातली आहे. कारखान्याने यंदा १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.‘छत्रपती’ला पूर्ववैभव प्राप्त करून देण्याच्या अटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सत्ताधाऱ्यांसह शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक आणि त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत मोट बांधली. सभासदांनीही या अनोख्या युतीवर विश्वास ठेवत संचालक मंडळाला भरभरून मतदान करत निवडून दिले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे जाचक यांच्यावर अध्यक्ष पदाची तर कैलास गावडे यांच्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर अध्यक्ष जाचक आणि संचालक मंडळाने आत्तापासूनच कंबर कसली आहे. विजयानंतर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाला गावाेगावी सत्कारासाठी निमंत्रण येत आहेत. 

मात्र, संचालक मंडळाने शेतकऱ्यांना आवाहन केले असून, आम्हाला सत्काराला हार-गुच्छ देऊ नका. तुम्ही मताच्या रूपाने आमचा सत्कार केला आहे. हार-गुच्छ नको... पण गाळपासाठी आपल्या कारखान्याला ऊस देण्याचे आवाहन करत सभासदांना साद घातली आहे. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये छत्रपतीच्या सभासदांचा सुमारे ८ ते ९ लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असतो. मात्र, काही सभासद ऊस गाळपासाठी छत्रपती कारखान्याला न देता दुसऱ्या कारखान्यांना देत असतात. याचा परिणाम ‘छत्रपती’च्या गाळपावर होत असून, गाळप कमी होत असल्याने कारखान्याचे व सभासदांचे नुकसान होते. कारखान्याला पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी साथ देण्याचे आवाहन केले आहे. १२ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट...या संदर्भात श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले की, चालूवर्षीच्या गळीत हंगामामध्ये १२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होणे गरजेचे आहे. तसेच साखरेचा उताराही जास्त मिळवण्यासाठी नियोजन सुरू आहे. यापूर्वी ‘छत्रपती’च्या कार्यक्षेत्रामध्ये १२ टक्केपेक्षा जास्त उतारा मिळाला होता. सभासदांनी चालूवर्षी सर्व ऊस आपल्या श्री छत्रपती कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जाचक यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊसBaramatiबारामतीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवार