शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आता नको इंग्रजीची भिती; पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अद्ययावत प्रयोगशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 15:22 IST

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये भाषेची अद्ययावत प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. या प्रयोगशाळेचे उद्घाटन ‘लेंड-ए-हँड-इंडिया’ संस्थेच्या प्रमुख सुनंदा माने यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्दे‘लेंड-ए-हँड-इंडिया’ संस्थेच्या प्रमुख सुनंदा माने यांच्या हस्ते करण्यात आले प्रयोगशाळेचे उद्घाटनप्रयोगशाळा ३० संगणक, प्रिंटर, स्कॅनर, एलईडी, प्रोजेक्टरने सुसज्जआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संभाषण, लेखन, संवाद आणि क्रियांच्या माध्यमातून शिक्षण

पुणे : मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीविषयी एक प्रकारची भिती असते़ त्यातूनच इंग्रजीतून संवाद साधण्यास ही मुले मागे पडतात़ त्यामुळे व्यवहारी जगामध्ये इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांच्या तुलनेत ही मुले मागे राहताना दिसत असल्याचे आजवर दिसून आले आहे़ यावर मात करण्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये भाषेची अद्ययावत प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. या प्रयोगशाळेचे उद्घाटन ‘लेंड-ए-हँड-इंडिया’ संस्थेच्या प्रमुख सुनंदा माने यांच्या हस्ते करण्यात आले. शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील भंडगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ही प्रयोगशाळा ३० संगणक, प्रिंटर, स्कॅनर, एलईडी, प्रोजेक्टरने सुसज्ज आहे. इंग्रजी शिकविण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअरने सुसज्ज आहे. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ती उपलब्ध होणार आहे. आठवड्याला एका विद्याथ्यार्ला किमान एक तास सराव करता येईल असे नियोजन करण्यात आले आहे. शिक्षकांना दोन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेची भिती वाटते.  इंग्रजीविषयी त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण झालेला असतो. तो कमी करण्यासाठी या प्रयोगशाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संभाषण, लेखन, संवाद आणि क्रियांच्या माध्यमातून सोप्या पध्दतीने इंग्रजीचे शिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापक नागेश मोने यांनी यावेळी दिली. तीन स्तरावर हा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. इंग्रजीचे शिक्षक शैलेश बर्गे यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. निकिता महाजन यांनी सूत्रसंचालन केले. क्षितिज गवाणकर, स्वाती मिश्रा यांनी तंत्रज्ञानाची ओळख करून दिली.

टॅग्स :SchoolशाळाPuneपुणेenglishइंग्रजी