पुणे: ' कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये."आपला देश ऋषी आणि कृषी यांचा देश आहे. जर देशात ऋषी म्हणजे ज्ञानी नसते आणि कृषी नसती, तर हा देश केव्हाच संपला असता." आत्मबल आणि धैर्य यांचे महत्त्व सांगताना त्यांनी शेतकऱ्यांना आत्मविश्वास आणि मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी विविध उपक्रमांची ओळख करून दिली असे प्रतिपादन" श्री श्री रविशंकर यांनी केले.
किसान समृद्धी महोत्सव 3.0 " मध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार श्वेता महाले उपस्थित होत्या. श्री श्री रविशंकर म्हणाले, “जेव्हा मनोबल आणि आत्मविश्वास असतो, तेव्हा कोणतेही कार्य अशक्य राहत नाही. त्यांनी ‘प्रोजेक्ट भारत’ विषयी सांगितले, ज्या अंतर्गत प्रत्येक गावातील पाच लोकांची निवड केली जाईल, जे गावाच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी कार्य करतील.
आर्ट ऑफ लिव्हिंग ही गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी स्थापन केलेली जागतिक स्वयंसेवी संस्था आहे, जी तणावमुक्त जीवनशैली, सामाजिक आणि मानवीय सेवा, तसेच शाश्वत विकास यासाठी कार्य करते. संस्थेने शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम सुरू केले असून, त्याद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे.
आमदार श्वेता महाले म्हणाल्या गुरुदेवांनी शेतकऱ्यांचे मनोबल उंचावले. आर्ट ऑफ लिव्हिंग ही एकमेव संस्था आहे जी मानसिक आरोग्य, समाज आणि निसर्ग या तिन्ही स्तरांवर समग्र पद्धतीने कार्य करते. जलयुक्त शिवार आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या विविध उपक्रमांमुळे महाराष्ट्रभर मोठे सकारात्मक बदल घडले आहेत. २०२४ मध्ये या प्रयत्नांमुळे भूजल पातळी वाढली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले.”
आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने शेतकऱ्यांसाठी समृद्ध पर्यावरण तयार केले असून २३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. १ लाखाहून अधिक जलसंधारण रचना उभारण्यात आल्या असून २०,००० हून अधिक गावांमध्ये३.४५ कोटी लोकांना त्याचा लाभ झाला. या उपक्रमांनी महाराष्ट्रभर सकारात्मक बदल घडवले आहेत.