शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

पर्यटकांसाठी ताम्हिणी, सुधागड, अंधारबन ‘‘बंद’’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 5:36 PM

पर्यटकांच्या बेजबाबदारपणा आणि बेशिस्तपणामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचे निदर्शनास...१२, ४९.६२

ठळक मुद्देजैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी वनविभागाचा पुढाकारपर्यटनाच्या नावाखाली चाललेल्या स्वैराचाराने पर्यावरणाची हानी होत असल्याने प्रशासनाचा त्यावर कडक पावले उचलण्याचा निर्णय १५० हून अधिक पक्षांच्या जाती आणि फुलपाखरांच्या ७० पेक्षा अधिक प्रजातींचे वास्तव्य

पुणे :  पश्चिम घाटातील जैवविविधता व पर्यावरण यांच्या संवर्धनाकरिता वनविभागाने पुढाकार घेतला आहे. याचा भाग म्हणून पश्चिम घाटांतर्गत येणा-या ताम्हिणी, सुधागड आणि मुळशी भागातील अंधारबन भागात पर्यावरणाच्या दृष्टीने ठरवून देण्यात आलेल्या अतिसंवेदनशील भागात पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात येणार आहे.   याविषयी अधिक माहिती देताना पुणे वनपरिक्षेत्र विभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर म्हणाले, वनविभागाच्यावतीने नुकताच पश्चिम घाटातील ताम्हिणी, सुधागड आणि अंधारबन येथील परिसराचा अभ्यास करण्यात आला. यावेळी पर्यटकांच्या बेजबाबदारपणा आणि बेशिस्तपणामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. याभागातील महत्वाची जैवविविधता देखील नष्ट झाली आहे. तसेच पर्यटनाच्या नावाखाली चाललेल्या स्वैराचाराने पर्यावरणाची हानी होत असल्याने प्रशासनाने त्यावर कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यापुढील काळात या परिसरात बेतालपणे वर्तन करणा-यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.२०१३ च्या राज्य वनविभागाच्या अधिनियमानुसार ताम्हिणी घाटातील अभयारण्याची नोंद आहे. ४९.६२ चौ.कि.मी. एवढे क्षेत्रात विस्तारलेल्या हे अभयारण्य वेगवेगळ्या १२ भागात विभागले असून ते पौड, सिंहगड या पुणे वनविभागात येतात. या अभयारण्यात सस्तन प्राण्यांच्या २५ प्रजाती आहेत. विशेष म्हणजे यात महाराष्ट्राचा राज्यप्राणी  ‘‘शेकरु’’ याचाही समावेश आहे. याबरोबरच बिबट्या, भेकर हे देखील या परिसरात आढळतात. १५० हून अधिक पक्षांच्या जाती आणि फुलपाखरांच्या ७० पेक्षा अधिक प्रजातींचे वास्तव्य आहे. घनदाट जंगल अशी ओळख असलेल्या अंधारबन हे जंगल ताम्हिणी घाटाच्या मध्यवर्ती भागापासून १३ किमी अंतरावर आहे. पर्यटकांच्या दृष्टीने हे अत्यंत प्रसिध्द ठिकाण आहे. येथे सातत्याने हौशी पर्यटकांची वर्दळ सुरु असते. दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान येथील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. काही खासगी ट्रेकर संस्था याठिकाणी ट्रेकिंगचे आयोजन करतात. साप्ताहिक सुटीच्या दिवशी हजारो पर्यटकांची गर्दी या भागात पाहवयास मिळते. प्रशासनाकडून करण्यात येणा-या कारवाईविषयी माहिती देताना खांडेकर म्हणाले की, आमच्याकडून कारवाईला सुरुवात झाली असून पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील भागात गस्त घालण्यात येत आहे. कुठे अनुचित प्रकार घडताना दिसल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच साप्ताहिक सुटीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त मनुष्यबळ वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. पर्यटकाकडून वनविभागाच्यावतीने नमुद केलेल्या कुठल्याही नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. याशिवाय त्यात दोषीं आढळल्यास पर्यटक अथवा संबंधित सहल आयोजकाला सहा वर्षांपर्यत शिक्षेला सामोरे जावे लागेल. 

टॅग्स :Puneपुणेforestजंगलtourismपर्यटन