राष्ट्रवादीत पुणेरी पगडीला नाे एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 20:57 IST2018-06-10T20:57:19+5:302018-06-10T20:57:19+5:30
पश्चिम महाराष्ट्र हल्लाबाेल सभेच्या सांगता सभेत छगन भुजबळ अाणि शरद पवार यांचा पुणेरी पगडी घालून स्वागत करण्यात अाले. यावर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये कुठली पगडी घालायची हे सांगून शरद पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टाेचले.

राष्ट्रवादीत पुणेरी पगडीला नाे एन्ट्री
पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा 20 वा स्थापनादिवस अाणि पश्चिम महाराष्ट्र हल्लाबाेल अांदाेलनाची सभा रविवारी संध्याकाळी पुण्यात पार पडली. यावेळी शरद पवार अाणि छगन भुजबळ यांचे स्वागत करताना राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण अाणि जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी पुणेरी पगडी घालून दाेघांचे स्वागत केले. तेव्हा भाषणाला उभे राहताच राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यक्रमाला सत्कार करताना कुठली पगडी घालून स्वागत करायचे हे मी अाज सांगत अाहे अाणि या पुढे हिच पगडी वापरायची असे सांगत शरद पवार यांनी फुले पगडी भुजबळांना घालण्यास सांगितली.
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा 20 वा स्थापनादिवस अाणि पश्चिम महाराष्ट्र हल्लाबाेल अांदाेलनाच्या सभेला कार्यकर्त्यांनी माेठी गर्दी केली हाेती. भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर ते पहिल्यांदा जाहीर भाषण करणार असल्याने सगळ्यांचे लक्ष ते काय बाेलतात याकडे लागले हाेते. सुरुवातील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची भाषणे झाली. भुजबळांच्या प्रकृतीमुळे ते व्हॅनिटीमध्येच बसून हाेते. अजित पवारांचे भाषण चालू असताना ते मंचावर अाले. यावेळी त्यांचा व शरद पवार यांचा पुणेरी पगडी घालून स्वागत करण्यात अाले. ही बाब खटकताच भाषणाच्या वेळी त्यांनी सर्वप्रथम कुठली पगडी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये घालायची हे सर्वांना सांगितले. अाणि हे कायम लक्षात ठेवण्याचे अावाहनही कार्यकर्त्यांना केले. त्यानंतर फुले पगडी अाणत भुजबळांचे पुन्हा स्वागत करण्यात अाले.