शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आधारकार्ड नाही तर प्रवेश नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 13:04 IST

सध्या सगळ्याच शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू आहे. अशातच इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांचा कल मोठ्या प्रमाणावर आहे.

ठळक मुद्देशाळेचा अजब प्रकार : महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेने प्रवेशासाठी आधारकार्ड केले सक्तीचेमुलांचे आधारकार्ड नसणाऱ्या पालकांना सदर शाळा प्रवेश नाकारत असल्याची तक्रार आधारकार्ड केंद्रच उपलब्ध नाही तर आधारकार्ड काढणार तरी कुठे, अशी पालकांची समस्या

मनोज गायकवाड पुणे : नर्सरी, एल.के.जी., यू.के.जी.ला प्रवेश घ्यायचाय तर विद्यार्थ्याचे आधारकार्ड व बँकेत खाते आहे का, तरच प्रवेश दिला जाईल; अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही. महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेतून पालकांना अशी उत्तरे मिळत आहेत.

आधारकार्ड केंद्रच उपलब्ध नाहीत.तर आधारकार्ड काढणार तरी कुठे, अशी समस्या पालक सांगत आहेत. आधारकार्ड नाही तर बँकेत खातेही निघत नाही, अशा परिस्थितीत शाळेत प्रवेश कसा घ्यायचा, या समस्येने पालक हतबल झाले आहेत. असा प्रकार मुंढव्यातील राजर्षी शाहू महाराज प्राथमिक विद्यालयातील महानगरपालिकेच्या इंग्रजी शाळेत घडल्याचे समोर आले आहे. असे अनेक पालक आहेत की ज्यांच्याकडे मुलांचे आधारकार्ड नाही. मग अशा पालकांनी मुलांना शाळेत टाकायचेच नाही का, असा सवाल आता पालक करीत आहेत.           तीन वर्षांची मुलं झाली की पालक त्याला शाळेत घालण्यासाठी शाळांचा शोध सुरू करतात. सध्या सगळ्याच शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू आहे.त्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांचा कल मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मुंढवा येथील राजर्षी शाहू महाराज प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात पालिकेच्या इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली आहे. या प्रवेशादरम्यान मुलांचे आधारकार्ड नसणाऱ्या पालकांना सदर शाळा प्रवेश नाकारत असल्याची तक्रार पालक करीत आहेत. ‘लोकमत’ प्रतिनिधीने शाळेची भेट घेतली.  यात इंग्रजी माध्यम शाळेला मुख्याध्यापकच नसून शाळेतील एका शिक्षिकेलाच प्रभारी मुख्याध्यापकाची जबाबदारी दिली आहे. या पदावर अस्मिता शेंडगे या काम पाहत आहेत. ......आधारकार्ड केंद्रच नाहीत तर प्रवेशासाठी सक्ती कशासाठी? इंग्रजी माध्यम शाळांमध्ये वयाची ३ वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रवेश दिला जातो. मुंढवा-केशवनगर भागात नर्सरी, एल.के.जी., यू.के.जी.साठी अनेक खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. त्या शाळांची वार्षिक फी २0 हजार ते ५0 हजार इतपत आहे. ज्यांची आर्थिक कुवत असते असे पालक खासगी शाळेत जाऊन प्रवेश घेतात. परंतु जे पालक मजूरवर्ग, कामगारवर्ग, कंत्राटी कामगारवर्ग असे आहेत, असे पालक महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेण्यास इच्छुक असतात. ....... खासगी शाळांची पाहणी केली तर कुठेही या वर्गांच्या प्रवेशासाठी आधारकार्ड सक्तीचे नाही. परंतु असे असतानाही पुणे महानगरपालिकेच्या शाळेत नर्सरी, एल.के.जी., यू.के.जी.साठी आधारकार्ड सक्तीचे करून प्रवेश नाकारायचा कायदा आहे का. दोन-तीन वर्षांपूर्वी पाच ते सहा आधारकार्ड केंद्रे अद्ययावत होती. परंतु सद्यस्थितीला मुंढवा-केशवनगरमध्ये एकही केंद्र सुरु नाही. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांचे आधारकार्ड आठ दिवसांत शाळेला द्यायचे कसे. या अशा अनेक बाबींमुळे पालक त्रस्त झाले आहेत. शाळेतील शिक्षक पालकांशी व्यवस्थित बोलत नसल्याच्याही तक्रारी समोर येत आहेत.......आम्हाला विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी आधारकार्ड घेणे बंधनकारक असल्याच्या सूचना वरिष्ठांकडून आहेत. मुलांचे आधारकार्ड नाहीत, अशा पालकांना आम्ही आठ दिवसांचा कालावधी देत आहोत. त्या कालावधीत त्यांनी आपल्या पाल्याचे आधारकार्ड काढल्याची पावती शाळेत दाखवली तरच प्रवेश निश्चित केला जाईल.- अस्मिता शेंडगे, प्रभारी मुख्याध्यापिका

 

टॅग्स :PuneपुणेMundhvaमुंढवाSchoolशाळाEducationशिक्षणAdhar Cardआधार कार्डPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका