शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ना वीज ना पाणी..., पुणे जिल्ह्यातील तब्बल १ हजार ३८५ अंगणवाड्या अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 15:31 IST

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या एक हजार ३८५ अंगणवड्यांमध्ये अद्यापही वीजजोड नसल्याने भवितव्यच अंधारात गेले

दुर्गेश मोरे

पुणे : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या एक हजार ३८५ अंगणवड्यांमध्ये अद्यापही वीजजोड नसल्याने भवितव्यच अंधारात गेले आहे. वीजच नाही तर एक हजार २७ अंगणवाड्यात स्वतःचे पाणी कनेक्शन नसल्याने पाण्यासाठी मुलांना टाहो फोडवा लागत आहे.

१९८५ पासून एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यान्वित असून चार हजार ६६९ अंगणवाड्यांमधून लाभार्थ्यांना सेवा दिल्या जातात. याद्वारे बालके, गर्भवती महिला, किशोरवीयन मुली, स्तनदा माता यांसाठी विविध उपक्रम राबिवले जातात. या अंगणवाड्यांमध्ये अनेक सोयीसुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, तरीही अनेक अंगणवाड्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. महिला व बालकल्याण विभागामार्फत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जल जीवन मिशन अंतर्गत एक हजार २८ अंगणवाड्यांमध्ये स्वतंत्र नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. यामुळे मुलांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

जिल्ह्यातील चार हजार ६६९ पैकी एक हजार ३८५ अंगणवाड्यांना स्वत:ची वीजजोड नाही. त्यांना त्वरित वीजजोड देण्यात येणार आहे. त्यासंदर्भात नुकतीच वीज वितरण कंपनीबरोबर महिला व बाल कल्याण विभागाची बैठक पार पडली. त्यामध्ये वीजजोड तत्काळ देण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे या अंगणवाड्यांमध्ये लवकरच वीज उपलब्ध होणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना उंची मापकपट्टी, डिजिटल वजन काटे, लहान बाळाची उंची मोजण्याची पट्टी देण्यात आली आहे. ही सर्व उपकरणे १ जुलैपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महिला व बाल विभागाकडून सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ४२८ अंगणवाड्यांना सोलर

अंगणवाड्यांना बिलाची तरतूद नसल्याने जिल्ह्यातील सुमारे ४२८ अंगणवाड्यांना सोलर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे या बीजबिलात मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. वास्तविक जिल्ह्यातील तीन हजार ६०० अंगणवाड्यांचे छत सोलर बसवण्यासारखे तयार करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी सोलर बसवण्याचा महिला व बाल विकास विभाग प्रयत्न करणार आहे. दरम्यान, २०३ अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृह नसल्याने त्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून प्रती अंगणवाडी ४० हजार रुपये ग्रामपंचायतींना मिळणार आहे. त्या निधीतून या अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील एक हजार ३८५ अंगणवाड्यांमध्ये स्वतंत्र वीजजोड देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना तीन हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यामध्ये मीटर, डिपोझिट वगैरेसारख्या गोष्टींवर ही रक्कम खर्च करावयाची आहे. ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन वीज वितरणशी समन्वय साधत लवकरात लवकर वीजजोड करून घ्यावी. काही अडचण असल्यास महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधावा असे जे. बी. गिरासे( उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग) यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाelectricityवीजWaterपाणीGovernmentसरकार