शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जोपर्यंत 'त्या' शिक्षकावर कारवाई नाही, तोपर्यंत मी कोविड चाचणी करणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 21:33 IST

गेल्या दीड वर्षापासुन छोट्या-मोठ्या कारणांवरून एक शिक्षक नाहक मानसिक त्रास देत असल्याची तक्रार महिला शिक्षिकेने हवेली पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे केली आहे.

लोणी काळभोर : लोहगाव (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एक शिक्षक गेले दीड वर्षापासुन छोट्या - मोठ्या कारणांवरून नाहक मानसिक त्रास देत असल्याची तक्रार त्याच शाळेतील महिला शिक्षिकेने हवेली पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे केली आहे. त्रास देणाऱ्या शिक्षकाच्या विरोधात पुराव्यासह वारंवार तक्रारी केल्याचा दावा संबधित शिक्षिकेने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला दिलेल्या तक्रारीत केला आहे. 

तक्रारकर्त्या शिक्षिकेने गेले ४ दिवसापासून सर्दी, अंगदुखी, ताप यासारखी कोरोनाची लक्षणे जाणवू लागली आहेत. मात्र, वारंवार तक्रार करुनही संबधित शिक्षकावर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ तक्रारकर्त्या महिला शिक्षिकेने, कोविडची चाचणी करण्यास अथवा उपचार घेण्यास नकार दिल्याने शिक्षण खात्यात एकच खळबळ उडाली आहे. 

ही महिला व पुरुष लोहगाव परिसरातील एका वस्ती शाळेवर मागील काही दीड वर्षापासुन शिक्षक म्हणुन काम करतात. मात्र गेले दीड वर्षापासुन शिक्षक हा छोट्या - छोट्या कारणावरुन कामात अडवणुक करण्याबरोबरच मानसिक त्रास देत असल्याचा आरोप शिक्षिकेने २० दिवसापुर्वी हवेली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी रामदास वालझडे यांच्याकडे लेखी स्वरुपात केला आहे. मात्र, तक्रारीची चौकशी पूर्ण होऊन, संबधित शिक्षकावर कारवाई होत नाही तोपर्यंत कोविडची चाचणी करण्यास अथवा कोविडचा उपचार घेण्यास नकार दिल्याने, शिक्षण खात्यात एकच खळबळ उडाली आहे.

या शिक्षकाने सर्व आरोप फेटाळुन लावले आहेत. अनेक वेळा शाळेत उशिरा आल्यानंतर, त्यांना सही करण्यास नकार दिल्यानेच त्यांनी माझ्याविरोधात खोट्या व बिनबुडाच्या तक्रारी केल्या आहेत. असे त्यांचे म्हणणे आहे. 

रामदास वालझडे ( हवेली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी ) लोहगाव येथील महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरुन, संबधित पुरुष शिक्षकाची चौकशी करण्यासाठी चार जणांची चौकशी समिती नेमली आहे. ही समिती पुढील ४८ तासात चौकषी अहवाल देणार आहे. हा चौकशी अहवाल वरीष्ठ कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसTeacherशिक्षकWomenमहिला