पणदरेच्या सरपंचांवर अविश्वास ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:12 IST2021-02-05T05:12:33+5:302021-02-05T05:12:33+5:30
बारामती तालुक्यातील अतिशय महत्त्वपूर्ण असलेली पणदरे ही ग्रामपंचायत आहे. भाजपा सरकार असताना जनतेतून सरपंच निवड केली जात होती. ...

पणदरेच्या सरपंचांवर अविश्वास ठराव
बारामती तालुक्यातील अतिशय महत्त्वपूर्ण असलेली पणदरे ही ग्रामपंचायत आहे. भाजपा सरकार असताना जनतेतून सरपंच निवड केली जात होती. पणदरे ग्रामपंचायतीच्या जनतेतून निवडल्या जाणाऱ्या पहिल्या सरपंच होण्याचा मान मीनाक्षी संभाजी जगताप यांना मिळाला होता.मात्र 14 सदस्यांकडून त्यांचेवर अविश्वास ठराव तहसीलदार विजय पाटील यांचेकडे नोटीस देऊन दाखल करण्यात आला आहे.तहसीलदार यांना अंजली विकास जगताप यांनी नोटीस दिली असून जमुना गगन सोनवणे,अश्विनी निखिल गायकवाड,शीतल भूषण जगताप,अर्चना रवींद्र कोकरे,अश्विनी सोमनाथ माने,निलम महेश लोखंडे,पूजा रवींद्र रुपनवर,भूषण महादेव जगताप,अभिजित सर्जेराव कोकरे,अमित शिवाजी कोकरे,रणजित रमेश जगताप,मनोज अशोक जगताप,अरुण भीमराव मोरे या १४ सदस्यांच्या सह्या आहेत.
सरपंच मीनाक्षी सर्जेराव जगताप यांचेवर अविश्वास ठराव नोटीस अंजली विकास जगताप व इतर 13 जणांनी दाखल केली असून याबाबत दि.३
फेब्रुवारी २१ रोजी दुपारी साडेतीन वाजता ग्रामपंचायत कार्यालय पणदरे येथे सर्व सदस्यांची विशेष सभा आयोजित केली असे तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितले.