शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

शहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 7:27 PM

पालिकेच्या अधिकाऱ्यांना नगरसेवकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.

पुणे : तळजाई टेकडीसह सिंहगड रस्त्यावर झालेली वृक्षतोड आणि बांधकाम व्यावसायिकांकडून इमारती बांधताना होणारी झाडांची कत्तल यावरुन नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेमध्ये चांगलेच धारेवर धरले. पालिकेच्या अधिकाऱ्यांना नगरसेवकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. शेवटी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी उत्तरे देऊन बोळवण केली. नगरसेवक सुभाष जगताप यांनी तळजाई टेकडीवर मोठ्या प्रमाणावर झाडे कापली गेली आहेत. वनविभागाच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रावरही ही वृक्षतोड झालेली आहे. वास्तविक त्यासाठी पालिकेची परवानगी घेणे आवश्यक होते. क्षेत्र जरी वनविभागाचे असले तरी पर्यावरण रक्षण ही पालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक होते असा मुद्दा उपस्थित केला. नगरसेविका नंदा लोणकर यांनी बांधकाम व्यावसायिकांकडून त्यांच्या साईट्सला चारही बाजूंनी मोठाले पत्रे लावून आतमध्ये असलेल्या झाडांची बिनबोभाट कत्तल होत असल्याकडे लक्ष वेधले. तर नगरसेवक अ‍ॅड. भैय्यासाहेब जाधव म्हणाले, झाडे तोडण्याची परवानगी दिल्यावर त्याबदल्यात दुसरीकडे लावल्या जाणाऱ्या वृक्षांची लागवड होते की नाही हे तपासण्याची यंत्रणा काय आहे अशी विचारणा केली. तसेच नगरसेवक अजित दरेकर यांनी सिंहगड रस्त्यावर झालेल्या वृक्षतोडीबद्दल किती गुन्हे दाखले अशी विचारणा केली.या प्रश्नांना आयुक्तांनी उत्तर दिले. आयुक्त म्हणाले, तळजाई टेकवडीवरील वनविभागाच्या जागेवरील क्लिरीसिडीया झाडे काढण्यात आली आहेत. त्यासाठी वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेतली आहे किंवा नाही याची माहिती घेतली जाईल. परंतू, राज्य शासनाने वन विभागाला अशी वृक्ष काढण्यासाठी प्राधिकृत केले आहे. नियमांचे उल्लंघन झालेले असल्यास कारवाई केली जाईल. तसेच बांधकाम व्यावसायिकांकडून बेकायदा वृक्ष तोड होत असल्यास त्याची तक्रार करावी, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, तसेच पयार्यी वृक्षारोपणाची माहिती घेतली जाईल. पयार्यी वृक्षरोपणासंदर्भात तज्ञ समुहाची मदत घेतली जाते. =====नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी उभे राहिलेल्या वृक्ष प्राधिकरणाचे वृक्ष अधिकारी तथा सदस्य सचिव गणेश सोनूने उभे राहिले. परंतू, त्यांना समाधानकारक उत्तरे देता नाहीत. अपुऱ्या माहितीच्या आधारे माहिती देताना सोनूने यांची तारांबळ उडाली. त्यामुळे शेवटी स्वत: महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी उभे राहात नगरसेवकांच्या प्रश्नांना मी उत्तरे देतो असे सांगून नगरसेवकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाenvironmentपर्यावरण