शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

एनआयआरएफ रँकिग : मुंबई आयआयटी, पुणे विद्यापीठ राष्ट्रीय मानांकनात वरच्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 4:45 AM

विविध विद्याशाखांचे शिक्षण देणाऱ्या देशभरातील दोन हजारांहून अधिक उच्चशिक्षण संस्थांचे यंदाच्या वर्षाचे ‘एनआयआरएफ रँकिग’ केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर केले.

पुणे  - विविध विद्याशाखांचे शिक्षण देणाऱ्या देशभरातील दोन हजारांहून अधिक उच्चशिक्षण संस्थांचे यंदाच्या वर्षाचे ‘एनआयआरएफ रँकिग’ केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर केले. या मानांकनांमध्ये सर्व संस्थांच्या सामायिक रॅकिंगच्या पहिल्या १० संस्थांमध्ये आयआयटी, मुंबईने तिसरे तर विद्यापीठांच्या पहिल्या १० रॅकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नववे स्थान मिळविले.पुणे विद्यापीठ वगळता राज्यातील एकाही पांरपरिक विद्यापीठाला या यादीत स्थान मिळालेले नाही.याच कार्यक्रमात नऊ वर्गांमध्ये सर्वोच्च रँकिंग मिळविलेल्या ६९ संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. उच्च शिक्षण संस्थांना ‘नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फे्रमवर्क’ (एनआयआरएफ) रॅकिंग देण्याचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. यंदा या रँकिंगमध्ये एकूण २,८०९ संस्थांही सहभाग घेतला. सहभागी झालेल्या सर्व संस्थांना सामायिकपणे जी पहिली १० मानांकने दिली गेली त्यात मुंबई आयआयटीचा तिसरा तर सावित्राबाई फुले विद्यापीठाचा १६ वा क्रमांक लागला. सर्वोत्कृष्ट विद्यापीठे व महाविद्यालयांच्या रँकिंगमध्ये राज्यात अनुक्रमे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व फर्ग्युसन महाविद्यालय अव्वल ठरले आहे. तर देशपातळीवर सर्व संस्थांमध्ये पुणे विद्यापीठाने मागील वर्षीच्या तुलनेत दोन क्रमांकांनी तर विद्यापीठांमध्ये एका क्रमांकाने प्रगती केली आहे. विद्यापीठांमध्ये राज्यातील पहिला क्रमांक पुणे विद्यापीठाने यंदाही कायम राखला. राज्यातील इतर पारंपरिक विद्यापीठे १०० ते २०० क्रमांकामध्ये आहेत.सामायिक रँकिंगमध्ये राज्यातील संस्था१. आयआयटी मुंबई (३)२. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (१६)३. इन्स्टिट्युट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई (३०)४. इंडियन इन्स्टिट्युट आॅफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर, पुणे (३२)५. होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्युट, मुंबई (४१)६. टाटा इन्स्टिट्युट आॅफ सोशल सायन्स, मुंबई (४९)७. सिम्बायोसिस विद्यापीठ, पुणे (६७)८. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे (७९)९. एसव्हीकेएम नरसी मोनजी इन्स्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई (८२)१०. भारती विद्यापीठ, पुणे (९३)११. कॉलेज आॅफ इंजिनिअरींग, पुणे (९६)राज्यातील अव्वल विद्यापीठे (कंसात देशातील रँकिंग)१. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (९)२. इन्स्टिट्युट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी (१९)३. होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्युट (२६)४. टाटा इन्स्टिट्युट आॅफ सोशल सायन्स (३२)५. सिम्बायोसिस विद्यापीठ (४४)६. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (५२)७. नरसी मोनजी इन्स्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज (५५)८. भारती विद्यापीठ (६६)९. डी. वाय. पाटील एज्युकेशनल सोसायटी, कोल्हापूर (९७)राज्यातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालये१. फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे (१९)२. राजीव गांधी इन्स्टिट्युट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड बायोटेक्नॉलॉजी, पुणे (६२)३. सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई (७४)४. भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ फाईन आर्ट्स, पुणे (९३)वास्तुशास्त्र, विधीमध्ये नाहीदेशपातळीवरील रँकिंगमध्ये वास्तुशास्त्र आणि विधीशिक्षण या गटांमध्ये गटात राज्यातील एकाही संस्थेचा पहिल्या दहामध्ये समावेश झालेला नाही.खासगी विद्यापीठांमध्ये सिम्बायोसिस प्रथम‘एनआयआरएफ’च्या सर्वोत्कष्ट शैक्षणिक संस्थांच्या रँकिंगमधील खासगी विद्यापीठांमध्ये राज्यात पुण्यातील सिम्बायोसिस विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर देशपातळीवरील यादीत विद्यापीठाला एकुण संस्थांमध्ये ६७ वा क्रमांक मिळाला आहे.सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत सिम्बायोसिसला राज्यात पाचवा क्रमांक मिळाला आहे. तसेच व्यवस्थापन आणि विधी गटामध्येही सिम्बायोसिस संस्थेने देशात अनुक्रमे १८ वा व नववा क्रमांक मिळविला आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकuniversityविद्यापीठStudentविद्यार्थी