नीरा आरोग्य केंद्राकडून पोलीओचे ९८ टक्के उद्दिष्ट पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:13 IST2021-02-05T05:13:13+5:302021-02-05T05:13:13+5:30
नीरा (ता. पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्या केंद्रांतर्गत नीरा शहर, गुळुंचे, कर्नलवाडी, पिंपरे (खुर्द), थोपटेवाडी, मांडकी ही सहा गावे येतात. ...

नीरा आरोग्य केंद्राकडून पोलीओचे ९८ टक्के उद्दिष्ट पूर्ण
नीरा (ता. पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्या केंद्रांतर्गत नीरा शहर, गुळुंचे, कर्नलवाडी, पिंपरे (खुर्द), थोपटेवाडी, मांडकी ही सहा गावे येतात. या सहा गावांतील पाच वर्षांच्या आतील १ हजार ९४६ बालकांना पल्स पोलिओचा डोस देणे अपेक्षित होते. यापैकी १ हजार ८९८ बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्यात आला. नीरा परिसरातील सहा गावांसह १६ ऊस तोडणी तांड्यावरील बालकांना आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांनी डोस दिले, तर रेल्वे स्टेशन, बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांसबोत जर पाच वर्षाच्या आतील बालक असल्यास त्या बालकाला डोस दिला असल्याची खात्री केली जात होती.
३१ डिसेंबर रोजी नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील ६० कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. गावागावातील प्रत्यक्ष पल्स पोलिओ बूथवर ४७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी डोस देणे व नोंद करण्याचे काम केले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर डांगे, आरोग्य सहायक गणेश जाधव, आरोग्य सेवक शिवाजी चव्हाण, पोपट गोडसे, बेबी तांबे, तालुक पर्यवेक्षक गणेश शिंदे यांनी प्रत्यक्ष बूथला भेट देऊन पल्स पोलिओची लस वेळेत उपलब्ध करत पाहणी करत अहवाल सादर केले.