शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील तब्बल 90 टक्के तलाठी राहतात सजांच्या बाहेर; नागरिकांचे होतेय गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 10:52 IST

सजांमध्ये न राहणा-या तलाठ्यांचे घरभाडे बंद करणार का याकडे लोकांचे लक्ष..

सुषमा नेहरकर- शिंदे

पुणे :पुणे जिल्ह्यात सध्या 548 तलाठी विविध ठिकाणी कार्यरत आहेत. परंतु यापैक 90 टक्क्यांपेक्षा अधिक तलाठी सजांच्या बाहेर म्हणजे पुण्यात किंवा तालुक्यांच्या ठिकाणी राहत असल्याची वस्तुस्थिती आहे. यामध्ये हवेली, खेड, शिरूर, मावळ, मुळशी, वेल्हा तालुक्यातील बहुतेक तलाठ्यांचा मुक्काम पुणे शहर, पिंपरी-चिंचवडमध्ये असल्याने गावात तलाठी आला नाही तर मी मिटींगमध्ये आहे, दुस-या गावात आहे अशीच उत्तरे सर्वसामान्य लोकांना ऐकायला मिळतात. यामुळे महसूल मंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे खरंच सजांमध्ये न राहणा-या तलाठ्यांचे घरभाडे बंद करणार का याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

गावपातळीवर तलाठी हा महत्त्वाचा घटक असून अनेक सजांमध्ये तलाठी कार्यालयाजवळच त्यांचे निवासस्थान बांधण्यात आले आहे. राज्यातील सर्व तलाठ्यांना त्याच्या सजातच थांबण्याच्या सूचना असून यानंतरही जे तलाठी सजांमध्ये राहणार नाहीत, त्यांचे घरभाडे बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच विधानसभेत जाहिर केले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तलाठी गावात हजर राहत नसल्याने गावातील लोकांनी तलाठी कार्यालयच बंद केल्याने याबाबत बोलताना यापुढे सर्व तलाठ्यांनी त्याच्या सजांमध्ये राहण्याचे आदेश दिले. पुणे जिल्ह्यात 548 तलाठी असून,  यापैकी खूपच कमी तलाठी सजांमध्ये राहत असतील. महसूल मंत्र्यांच्या घोषणेची अंमलबजावणी पुण्यात होणार का असा सवाल लोकांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्यातील तलाठ्यांची प्रांतनिहाय संख्या- पुणे शहर - शिरूर  : 57, बारामती- इंदापूर : 86, मावळ-मुळशी : 75, खेड : 51, पुरंदर- दौंड: 85, जुन्नर- आंबेगाव: 55, भोर - वेल्हा : 59, हवेली : 56

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmavalमावळIndapurइंदापूरBaramatiबारामती