शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
मोठी बातमी! ट्रान्स-हार्बर लोकल ट्रेन सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडला
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
4
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
5
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
6
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
9
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
10
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
11
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
12
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
13
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
14
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
15
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
17
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
20
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?

कोरेगाव पार्कमधील हॉटेलमधून पावणे नऊ लाखांची दारू हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 12:12 IST

​​​​​​​या हॉटेलमध्ये २९ वेगवेगळ्या कंपन्यांच्या दारूच्या बादल्या व बीयर बादल्या आढळून आल्या. त्याच्याकडे चौकशी केल्यावर हॉटेल परिसरात दारूचा साठा असलेले एक गोदाम आढळून आले.

पुणे : कोरेगाव पार्क येथील सतरंज रेस्टो अँड बार येथे लॉकडाऊनच्या काळात चोरून दारूविक्री होत असल्याचे समजल्यावर खंडणीविरोधी पथकाने छापा घालून तेथील ८ लाख ८४ हजार ९१५ रुपयांच्या देशी विदेशी मद्य व बियर जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना कोरेगाव पार्क येथील सतरंज रेस्टो अँड बारमध्ये चोरून दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या उपस्थितीत खंडणी विरोधी पथकाने खात्री करून घेतली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक, हवालदार मगर, चिखले, बागवान यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क खात्याचे सहायक आयुक्त संजय पाटील यांच्यासमवेत सतरंज रेस्टो अँड बारवर छापा घातला. तेथील कलीमउद्दीन रियाजुद्दीन शेख (रा. लेन नंबर ४, कोरेगाव पार्क) याला ताब्यात घेतले आहे.या हॉटेलमध्ये २९ वेगवेगळ्या कंपन्यांच्या दारूच्या बादल्या व बीयर बादल्या आढळून आल्या. त्याच्याकडे चौकशी केल्यावर हॉटेल परिसरात दारूचा साठा असलेले एक गोदाम आढळून आले. या गोदामात ७ लाख ६२ हजार ७४४ रुपयांची दारु आढळून आली. हॉटेल सुरू ठेवण्यास बंदी असताना ते चालू ठेवून बेकादेशीरपणे दारू विक्री केल्याबद्दल कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.